Akola News  Saam Tv
महाराष्ट्र

Akola News: दुर्दैवी! कुलरचा शॉक लागून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, अकोल्यात ७ दिवसांत तिघांनी गमावला जीव

Boy Died Due To Shock From Cooler In Akola: अकोल्यात कुलरने आणखी एका चिमुकल्याचा जीव घेतला आहे. खेळता खेळता कुलरजवळ गेलेल्या विराजचा विजेचा जोरदार झटका लागला. यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यामध्ये कुलरचा (Cooler) शॉक लागून ३ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अकोल्याच्या पिंजर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अकोल्यामध्ये आतापर्यंत कुलरमुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या ७ दिवसांमध्ये ३ चिमुकल्यांचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अकोल्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यात कुलरचा शॉक लागून ३ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना अकोल्याच्या पिंजर येथे घडली. विरांश रवी राजगुरे असे या चिमुकल्याचे नाव आहे. विरांश हा घरात खेळत होता. खेळता खेळता तो कुलरजवळ गेला. मात्र आचानक त्याला विजेचा झटका लागला. त्याच्या पोटाला दुखापत झाली होती. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, मागील सात दिवसांपूर्वी अकोल्यातल्या अकोट शहरातल्या काळेगाव गावात दोन मावस बहिणींचा कुलरचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला होता. ४ वर्षांची ईशानी प्रवीण ढोले आणि ५ वर्षांची प्रियांशी सोपान मेतकर असे कुलरचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलींची नावे होती. या दोन्ही मुली काळेगाव येथे मामाकडे आल्या होत्या. खेळत असताना कुलरला त्यांचा हात लागला आणि त्यांना जोराचा विजेचा शॉक लागला. या घटनेत दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात कुलरचा शॉक लागून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अकोल्यामध्ये काही दिवसांपूर्वीचं कुलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा धक्का लागून पोलिस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या घटनेत अकोला शहरातील युक्ती अमोल गोगे (७ वर्षे) या मुलीचा मृत्यू झाला होता. युक्ती ही घरात खेळत असताना कूलरजवळ गेली आणि विजेचा धक्का लागल्याने या तिचा जागेवरच मृत्यू झाला होता.

मळसूर गावात कूलरचा शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. नितीन गजानन वानखडे (३८ वर्षे) असे या व्यक्तीचे नाव आहे. कामावरुन घरी आल्यावर नितीन घरातील कूलर चालू करायला गेले. कूलर चालू होत नसल्याने त्यांनी तो चालू करण्याचा प्रयत्न केला पण अशातच त्यांना वीजेचा जोरात धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT