Accident News
Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : लग्नघरी जात असताना वाटेत काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

अॅड. जयेश गावंडे

Akola Accident News : दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  (Latest Marathi News)

अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज येथे लग्नघरी जात असतांना वाई फाट्याजवळ आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघातात पती-पत्नीचा आणि २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत संबंधित पोलीस (Police) स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर, दोन गंभीर जखमी झाला आहे. (Accident News)

हा अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर लागलीच रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी जखमींना तातडीने आकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, यातील तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले असून यासंदर्भात अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT