Akola Murtajapur News
Akola Murtajapur News Saam TV
महाराष्ट्र

Akola News : भयंकर! नाल्याच्या काठावरील दगडाची भिंत कोसळली, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

अॅड. जयेश गावंडे

मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. नाल्याच्या काठावर असलेली प्राचीन दगडाची भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्देवी घटना जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात आज (रविवार) सायंकाळच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

लकी लखन पचारे (वय २० वर्ष) आणि सागर नरेश सोळंखे (वय २४ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तर साबिर शहा मोहब्बद शहा असं जखमी तरुणाचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अकोला (Akola) जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरातल्या लक्कडगंज भागात एका मोठ्या नाल्याचं बांधाकाम मूर्तीजापुर नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान आज या नाल्याचं बांधकामासाठी लकी लखन पचारे , सागर नरेश सोळंखे आणि साबिर शहा मोहब्बद शहा हे तिघे आले होते.

सकाळपासूनच तिघांनी कामकाजाला सुरुवात केली. नाल्यात बांधकाम करत असताना अचानक काठावर असलेली दगडाची भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर त्याच्या मलमाखाली हे तिघेही दबल्या गेले. घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

या भयंकर घटनेत २० वर्षीय लकी लखन पचारे अन् २४ वर्षीय सागर नरेश सोळंखे हे दगडाच्या भिंतीखाली दबून मरण पावले. तर साबिर शहा मोहब्बद शहा हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मूर्तीजापूर शहर पोलिसांत (Police) आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi News : रायबरेलीतून राहुल गांधीं लढवणार लोकसभा, प्रियंका गांधी कुठली पोटनिवडणूक लढवणार?

Educational Tips: 'या' कारमांमुळे मुलं परिक्षेत अपयशी ठरतात

Today's Marathi News Live : मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी

Rohit Sharma On Captaincy: अखेर मौन सोडलं! कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितचं रोखठोक उत्तर

kriti Sanon : क्रितूच्या मॅडनेसची बातच और आहे

SCROLL FOR NEXT