Uddhav Thackeray vs BJP : नाशिकमधून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाने भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉ.अद्वय हिरे यांना आपल्या गळाला लावलं आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून लवकरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. (Maharashtra Political News)
नाशिकमध्ये भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. डॉ.अद्वय हिरे यांनी भाजपाला सोडचिठ्ठीदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षात प्रवेश करण्याचा क्रांतीकारक निर्णय घेतल्याने, नाशिकमधील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
हिरे यांनी भाजपचा (BJP) त्याग केल्याने पक्षाला मोठे खिंडार पडणार असल्याचं बोललं जातंय. एकीकडे नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अनेक कार्यकर्ते पदाधिकारी, तसेच माजी नगरसेवक गटात सामील होत आहे.
मात्र, असं असताना, नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व ठाकरे गटाने आपल्या गळाला लावलं आहे. दरम्यान, नुकतीच अद्वय हिरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. लवकरच ते ठाकरे गटात जाहीर प्रवेश करणार आहे.
कोण आहेत अद्वय हिरे?
अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन आहेत. नाशिक जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मालेगाव तालुका व परिसरातील स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा दरारा आहे.
अद्वय हिरे यांनी अचानक भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्यापाठोपाठ अनेक कार्यकर्तेही शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जातंय. असं झाल्यास नाशकात भाजपला मोठं खिंडार पडू शकतं.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.