akola political news  Saam tv
महाराष्ट्र

सत्ता समीकरण बदलणार; भाजपची सत्तेसाठी ठाकरे गटाला 'ऑफर', पक्षप्रमुख काय निर्णय घेणार?

अकोल्यात भाजपची युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला 'ऑफर' दिली आहे. भाजप आणि ठाकरेसेनेच्या नेत्यांच्या बैठकीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय.

Vishal Gangurde

२९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर

सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांकडून जुळवाजुळवी सुरू

भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी ठाकरे गटाला ऑफर

अक्षय गवळी, साम टीव्ही

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांकडून जुळवाजुळवी सुरू झाली आहे. अकोल्यात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ३ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. यासाठी भाजपने बैठकांचा सपाटा लावला आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपची ठाकरे गटाशी बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी ऑफर दिल्याची माहिती मिळत आहे.

अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपने थेट ठाकरेंच्या शिवसेनेला 'ऑफर' दिलीय. भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची अकोल्यात बैठक झाली. 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आहे.

भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला मदतीची मागणी केली आहे. उपमहापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची शिवसेनेकडून मागणी झालीची माहिती सूत्रांनी दिलीय. सेनेच्या प्रस्तावावर भाजप चर्चा करणार आहे. या दरम्यान भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीवर शिक्कामोर्तब झालाय. शहरातील विकासाच्या महत्त्वाचे मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्या, जोही आमच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका दाखवेल, त्याच्यासोबत आम्ही जाणार आहे. तसेचं सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे देशमुख म्हणाले आहे.

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा : 80

बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा : 06

शिंदे सेना : 01

अजित राष्ट्रवादी : 01

शरद राष्ट्रवादी : 03

वंचित : 05

एमआयएम : 03

अपक्ष : 02

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT