Akola Municipal Corporation hung verdict latest news Saam TV Marathi
महाराष्ट्र

Akola : बंडखोर आशिष ठरणार गेम चेंजर, काँग्रेस आणि भाजपकडून हालचाली, अकोला महापालिकेत सत्तेसाठी समीकरण काय? वाचा

Akola Municipal Corporation results 2026 : अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी स्थानिक नेतृत्वाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत ‘माझ्यासाठी सर्वच पर्याय खुले आहेत’ असे सूचक विधान केले आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Municipal Corporation hung verdict latest news : अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये. अकोला महापालिकेत एकूण 80 जागा आहेत. बहूमतसाठी 41 चा आकडं गाठणं महत्वाचं आहेय. त्यामुळे सत्तेच्या चाब्या दोन अपक्ष आणि शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहेय. दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेयेत. पवित्रकार यांनी 'साम'शी बोलतांना आपल्यासाठी सर्वच पर्याय खुले असल्याचं म्हटलंय. 'ये तो बस झाँकी है, असली पिक्चर अभी बाकी है' म्हणत पवित्रकार यांनी पुढच्या राजकारणाचे संकेत दिलेयेत. पवित्रकार हे भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे आहेय.

आशिष पवित्र पुढे बोलताना म्हणालेत आपल्यावर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केलाय. आपला काही दोष नसतांना पक्षाने निलंबित केलंय. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने निलंबन मागे घेण्यासह तिकीट देण्याचे आदेश दिला खरी, मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने आपल्याला जाणीवपूर्वक तिकीटापासून डावलले, असा आरोप देखील त्यांनी केलाय. त्यांचा रोख स्थानिक आमदार रणधीर सावरकर आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यावर आहेय. या सर्व परिस्थितीत आपण लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत पवित्रकार यांनी दिले..

अकोला महापालिका सत्तेसाठी भाजपचे गणित

अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 38 जागा जिंकल्याये. आणि अकोल्यात सर्वात मोठा पक्ष बनला. तर तिकडं काँग्रेसने 13 जागावरून यावेळी 21 जागा जिंकत दुसरा मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवला आहे. दोन्ही पक्षांनी सत्तेचं समिकरण बसविण्यासाठी हालचाली सुरु केल्याये..

भाजपचे 38 यासोबतच मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेचा एक, आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आलाय. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले आशिष पवित्रकार हे सुद्धा भाजपसोबत येऊ शकतात, असे संकेत आहेये. यासोबतच प्रभाग 7 मधून अकोला विकास समितीचा विजयी झालेला एक नगरसेवकाला सुद्धा भाजप सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. असे एकत्रित 42 चे संख्याबळ भाजप जमवू शकते, असेही संकेत आहेत.

दुसरीकडं 21 नगरसेवक काँग्रेसचे विजयी झाले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा, शरद पवार गटाचे 3, वंचित बहुजन आघाडीचे 5, एमआयएम पक्षाचे 3 यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एका नगरसेवकासह आशिष पलित्रकारा यांच्यासह प्रभाग 7 मधील अपक्ष नगरसेवक सोबत घेण्याचे प्रयत्न करीत आहे. हा आकडा 41 होतो आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना काँग्रेसकडून मोठ्या पदाची ऑफर देऊन त्यांना आपल्याकडे घेत 41 चा आकडा गाठण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहेय.

अकोला महापालिकेतील एकूण पक्षीय बलाबल

एकूण जागा : 80

बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा : 06

शिंदे सेना : 01

अजित राष्ट्रवादी : 01

शरद राष्ट्रवादी : 03

वंचित : 05

एमआयएम : 03

अपक्ष : 02

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Crispy Recipe: घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर क्रिस्पी; सोपी रेसिपी वाचा

मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी भरत भगतला बेड्या, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अद्याप फरार

Normal urination at night: रात्री किती वेळा लघवीला जाणं नॉर्मल मानलं जातं? पाहा डॉक्टरांनी काय सांगितलं

Maharashtra Live News Update: समरजीत घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी, लवकरच शरदचंद्र पवार गटाला राम राम करणार

Komal Kumbhar : अफेअर समजताच बाप संतापला; अभिनेत्रीला पाईपनं बेदम मारलं, आता प्रियकरासोबतच करतेय सुखानं संसार, वाचा किस्सा

SCROLL FOR NEXT