Akola Mayor Candidate  Saam Tv
महाराष्ट्र

Akola Mayor: अकोल्याचा महापौर कोण होणार? भाजप की ठाकरेसेना? कोण बसणार खुर्चीवर?

Akola Municipal Mayor News: अकोला महानगर पालिकेचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला महापौरपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. याठिकाणी भाजप आणि ठाकरेसेनेपैकी कुणाचा महापौर होतोय हे पाहणे महत्वाचे राहिल.

Priya More

Summary -

  • अकोला महापौरपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित

  • भाजपकडे ३८ जागा, बहुमतापासून ३ जागा दूर

  • काँग्रेस आघाडी सत्ता स्थापनेसाठी सक्रिय

  • प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग

अक्षय गवळी, अकोला

अकोला महापालिकेचं महापौरपद हे 'ओबीसी महिला' गटासाठी आरक्षित झालं आहे. त्यामुळे आता अकोल्यात कुणाचा महापौर होणार? याची उत्सुकता सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. अकोल्यात कोणत्याच पक्षाला आज बहुमत मिळालं नाहीये. त्यामुळं अकोला महापालिकेवर कुणाची सत्ता बसणार, महापौरपद कुणाला दिले जाणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून काही नावे चर्चेत आहेत. तर तिकडं वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. एकंदरीत आरक्षणाची सोडत निघताच या नावाची जोरदार चर्चा अकोला महानगरात सुरुये. दरम्यान, पाहूया अकोल्याच्या सत्ता समीकरणाचे गणित.

अकोला महापालिकेचा अतिशय धक्कादायक निकाल लागला होता. मागील निवडणुकीत भाजपने 80 पैकी 48 जागा जिंकत महापालिकेत एकहाती सत्ता राखली होती. मात्र, यंदा भाजपने 80 पैकी 38 जागा जिंकल्यात. मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांचा एक आणि एका समर्थित अपक्षासह भाजपला 40 जागा मिळाल्या. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढली आणि एकमेव नगरसेविका विजयी झाली. यंदा भाजपच्या 10 जागा घटल्यात. तर काँग्रेसने 13 वरून 21 वर मुसंडी मारली.

एमआयएम 1 वरून 3 वर गेली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक, वंचितचे 5, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 आणि भाजपचाच बंडखोर अपक्ष म्हणून आशिष पवित्रकार देखील नगरसेवक झाले. एकंदरीत भाजपला बहुमतासाठी जोडतोड करावी लागतंये. तर दुसरीकडे काँग्रेस भाजपला रोखण्यासाठी मोठी रणनीती आखते आहे. दरम्यान, भाजप अथवा काँग्रेसने गणित जुळवले आणि बहुमताचा 41 आकडा गाठला तर महापौर पदासाठी हे नावे चर्चेत आहेत.

महापौपदासाठी भाजपचे संभाव्य दावेदार :

1) नीतू जगताप : प्रभाग क्रमांक 3

2) पल्लवी मोरे : प्रभाग क्रमांक 4

3) रश्मी अवचार प्रभाग क्रमांक 5

4) वैशाली शेळके :  प्रभाग क्रमांक 10

5) कल्पना गोटफोडे : प्रभाग क्रमांक 12

महापौरपदासाठी ठाकरेगटाचे संभाव्य दावेदार :

1) सुरेखा काळे : प्रभाग क्रमांक 20

वंचित बहुजन आघाडीच्या महापौर पदाच्या संभाव्य दावेदार :

1) जयश्री बहादुरकर : प्रभाग क्रमांक 14

अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' रंगतंये. भाजपला रोखण्यासाठी आज एमआयएम, काँग्रेस आणि अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात बंद दाराआड बैठक झालीये. या बैठकीत एमआयएम आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा पुतण्या आशिष पवित्रकार देखील आंबेडकरांच्या निवासस्थानी बैठकीला होते.

पवित्रकार हे भाजपचे बंडखोर आणि अपक्ष नगरसेवक आहे. त्यांची सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका असणार आहे.. कारण कुण्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीये. तर ठाकरे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आज सायंकाळी आंबेडकरांची भेट घेणार आहेये. एकंदरीत 21 नगरसेवक असलेली काँग्रेस म्हणते आम्हाला कुठलंचं पद नकोय, भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येत यावं, अन अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करावी, अशी भूमिका काँग्रेसने बैठकीत मांडली आहे.

भाजप विरोधात एकत्र आल्यास असं असणारं गणित-

महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर लहान पक्षांना एकत्र करून सत्ता खेचून आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे 21, ठाकरे गटाचे 6, शरद पवार गटाचे 3, वंचितचे 5 आणि एमआयएमचे 3 नगरसेवक एकत्र आल्यास हा आकडा 38 होतो. मात्र, आजच्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेविकाचा पती फयाज खान आणि भाजपचे बंडखोर नगरसेवक आशिष पवित्रकार तसेच प्रभाग 7 मधील अपक्ष नगरसेवकसोबत आल्यास 41 बहुतमाताचा आकडा गाठू शकतो.

सर्व एकत्र आल्यास कुणाला कोणतं पद?

दरम्यान, आजच्या बैठकीनंतर भाजप विरोधात सर्वच पक्ष एकत्र आल्यास महापालिकेचे 'महापौर पद ठाकरेंच्या शिवसेने'कडे, तर उपमहापौर पद शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि स्थायी समिती सभापती पद वंचित बहुजन आघाडीला जाणार अशी शक्यता आहेय. आणि उर्वरित सभापती पद अपक्ष नगरसेवकांना जाण्याची शक्यता आहे. असं चित्र असलं तरी 38 नगरसेवक असलेला भाजप पक्ष म्हणतोय आमच्याकडं बहुमतापार 45 नगसेवकांचं गणित जुळलंये.

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल -

एकूण जागा : 80

बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा : 06

शिंदे सेना : 01

अजित राष्ट्रवादी : 01

शरद राष्ट्रवादी : 03

वंचित : 05

एमआयएम : 03

अपक्ष : 02

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

Shepu Bhaji Recipe : शेपूची भाजी फारच तुरट लागते? मग बनवताना 'हा' पदार्थ नक्की टाका

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

SCROLL FOR NEXT