अकोला : अकोला महापालिकेच्या निवडणूकीचा (akola muncipal corporation election) बिगुल वाजला असून राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची प्रारूप अधिसूचना जाहीर केली आहे. मनपा प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात हरकती,सूचना व आक्षेप नोंदविण्यासाठी एक ते १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या (election commission) निर्देशानंतर मनपाची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून निवडणूक (election) लढविणाऱ्या इच्छुकांची लगबग सुरु झाली आहे. ओबीसी आरक्षणाचा (obc reservation) मुद्दा कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने फेब्रुवारी महिन्यात पार पडणारी अकाेला (akola) महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्याचे समोर आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो नोव्हेंबर महिन्यात निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. वर्तमानस्थितीत अकोला महापालिकेत ८० सदस्य असून राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार त्यामध्ये आणखी ११ सदस्यांची वाढ करण्यात आली आहे. २१ सदस्यांची संख्या लक्षात घेता प्रभाग रचनेदरम्यान प्रभागांचे क्षेत्रफळ कमी करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्याबद्दल अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची प्रारुप अधिसूचना जारी करीत त्यावर आक्षेप, हरकती व सूचना नोंदविण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.