Akola FDA Raid Oil store  AI Image
महाराष्ट्र

Akola : अकोल्यात खाद्यतेलाच्या दोन पेढ्यांवर FDAची मोठी कारवाई; 11.82 लाखांचा तेलसाठा जप्त

Akola FDA Raid News : अकोला एमआयडीसी परिसरातील दोन खाद्यतेल पेढ्यांवर FDA ची मोठी कारवाई. भेसळीच्या संशयासह गंभीर त्रुटी आढळल्याने 11 लाख 82 हजार 650 रुपयांचा तेलसाठा जप्त आणि दोन्ही परवाने निलंबित.

Alisha Khedekar

  • अकोला एमआयडीसी परिसरातील दोन खाद्यतेल पेढ्यांवर FDA ची मोठी कारवाई

  • भेसळीच्या संशयावरून लाखोंचा तेलसाठा जप्त

  • दोन्ही पेढ्यांचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले

अक्षय गवळी, अकोला

अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात खाद्यतेलाच्या दोन पेढ्यांवर FDA ने मोठी कारवाई केली आहे. खाद्यतेलात भेसळ केल्याचा संशय तसेच विक्री आणि साठवणुकीसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने दोन्ही पेढ्यांमधील तब्बल 11 लाख 82 हजार 650 रुपयांचा तेलसाठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही पेढ्यांचे परवाने पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण पेढी येथे रिफाइंड सोयाबीन ऑईल ‘शक्ती’चा नमुना घेण्यात आला. तपासणीदरम्यान तेलामध्ये भेसळीचा संशय आढळून आला. तसेच सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री केली जात असल्याचेही निदर्शनास आले. पेढीकडे आवश्यक प्रयोगशाळा नसणे, प्रयोगशाळेचे अहवाल उपलब्ध नसणे आणि repacker चा परवाना असतानाही ट्रेडिंगचा व्यवसाय केल्याचे आढळून आले.

या कारवाईत प्रशासनाने 3,428 किलो 400 ग्रॅम खाद्यतेलाचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे 6 लाख 21 हजार 300 रुपये आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली. दरम्यान, भारतकुमार अँड ब्रदर्स पेढी येथेही रिफाइंड सोयाबीन ऑईल (लूज)चा नमुना घेण्यात आला. तपासणीमध्ये भेसळीचा संशय, प्रयोगशाळा अद्ययावत नसणे, सुट्ट्या तेलाची विक्री तसेच प्रयोगशाळेचे आवश्यक अहवाल उपलब्ध नसल्यासह अनेक त्रुटी आढळून आल्या.

या ठिकाणाहून 3,598 किलो 400 ग्रॅम तेलसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 5 लाख 61 हजार 350 रुपये आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांनी केली. दोन्ही पेढ्यांकडे repacker oil चा परवाना असतानाही तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळल्याने प्रशासनाने त्यांचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning sneezing: सकाळी उठल्यावर अचानक शिंका येतायत? या 3 गंभीर समस्या असू शकतात

Maharashtra News Live Update: चांदोली-वारणा धरण 100 टक्के भरलं, सांगली-कोल्हापूरची पाण्याची चिंता मिटली

Refined oil alternatives: रिफाइंड तेल धोकादायक! हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात हे 5 प्रकारचे तेल

High Blood Pressure : हाय बीपी काही मिनिटांत होईल कमी, फक्त करा 'हे' छोटं काम

आयुष्यभर पंढरीची वारी करणाऱ्या १५ ज्येष्ठांच्या पायी नतमस्तक! कामशेतमध्ये रंगला भक्तीमय सोहळा

SCROLL FOR NEXT