Kiran Choudhary, bribery case Saam TV
महाराष्ट्र

तब्बल १.५ कोटींची कॅश अन् सोन्याची बिस्किटं! अकोल्याच्या 'त्या' लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं मोठं घबाड

Kiran Choudhary, bribery case : अकोल्यातील लाचखोरी प्रकरणात एसीबीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. किरण चौधरी यांच्या घरातून तब्बल ₹२.९४ कोटींची रोख रक्कम, सोन्याची बिस्किटे, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Kiran Choudhary bribery case : लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावमधील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. एसीबीच्या पथकाने तब्बल २४ तास राबवलेल्या शोधमोहिमेत चौधरी यांच्या घरातून सुमारे २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचे (जवळपास ३ कोटी) मोठे घबाड जप्त केले आहे. नाशिक आणि जळगाव एसीबीच्या संयुक्त पथकाने 'इन कॅमेरा' (व्हिडिओ रेकॉर्डिंग करत) ही संपूर्ण झाडाझडती घेतली.

यापूर्वी २७ जून रोजी जिल्हाधिकारी चौधरी यांच्या चुलत्याने सील केलेल्या घराचे कुलूप तोडून आतून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर काल, २ जुलै रोजी चौधरी यांच्या पत्नी मनीषा चौधरी, नातेवाईक, दोन शासकीय पंच, बँक कॅशियर आणि सोनार यांच्या उपस्थितीत घराचे सील उघडून झाडाझडती घेण्यात आली.

एसीबीच्या छाप्यात काय-काय सापडले?

रोख रक्कम: १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपये (५००, २००, १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांची पुडकी).

सोन्याचे दागिने: ६० लाख ५७ हजार १३५ रुपये किमतीचे ४२२ ग्रॅम सोने (यात १६० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे).

खरेदी पावत्या: ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या.

चांदी: ३१ हजार ४१६ रुपये किमतीची १५४ ग्रॅम चांदी.

प्रॉपर्टीचे कागदपत्रे: ६२ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीच्या वेगवेगळ्या मालमत्तांचे खरेदीखत आणि बक्षीसपत्रांचे दस्तऐवज (हे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर आहेत).

घरातील वस्तू: ६ लाख २५ हजार ५४५ रुपये किमतीचे घरातील महागडे सामान.

तपासाला वेग, कारवाईमुळे राज्यात खळबळ

सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्यावर अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल आहे. २५ जून रोजी एसीबीचे पथक गेले तेव्हा घर बंद असल्याने ते सील करण्यात आले होते. त्यानंतर नातेवाईकांनी घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने संशय बळावला होता. अखेर काल घेतलेल्या झडतीत हे कोट्यवधींचे घबाड बाहेर आल्याने महसूल आणि पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात आंदोलनाच्या ५५ तासांनंतर जिल्हा प्रशासनाला जाग

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

सर्वाधिक गोल करणाऱ्या 'किंग'चा फुटबॉलला अलविदा; रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती,चाहत्यांना अश्रू अनावर

MSRTC Employees diwali bonus 2026 : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; एकाच वेळी बोनस, अॅडव्हान्स आणि महागाई भत्त्याची घोषणा

Train Travel Rules: प्रवासात बॅग ट्रेनमध्ये विसरलात? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने परत मिळेल तुमचे सामान

SCROLL FOR NEXT