Police display seized fake ₹500 notes after busting a counterfeit currency racket in Akola. saam tv
महाराष्ट्र

बनावट 500 रुपयांच्या नोटांचे रॅकेट उघड; तिघांना अटक, 97 हजारांच्या 194 नोटा जप्त

Akola Fake Currency Racket 500 Rupee Notes Seized: अकोल्यात 500 रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 97 हजार रुपयांच्या 194 नोटा जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत 500 रुपयांच्या एकूण 194 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत 97 हजार रुपये आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील गुडधी आणि मूर्तिजापूर परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. त्यावेळी चंदन भीमराव घांडोरे हा तरुण बाजारात 500 रुपयांच्या बनावट नोटांसह फिरताना आढळून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत आणखी दोघांचा सहभाग समोर आला.

यानंतर पोलिसांनी मूर्तिजापूर येथून जहीरोददीन जबीरोददीन आणि विठ्ठल वारोकार यांना अटक केली. या तिन्ही आरोपींकडून 500 रुपयांच्या 194 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. प्राथमिक तपासात या बनावट नोटा बुलढाणा जिल्ह्यातून अकोल्यात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघे गुडधी (ता. अकोला) येथील रहिवासी असून एक जण मूर्तिजापूर तालुक्यातील रहिवासी आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अकोला पोलिसांकडून सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच बनावट नोटांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT