Akola  saam tv
महाराष्ट्र

Akola : अस्वच्छतेमुळे आरोग्यमंत्र्याचा दौरा रद्द! आमदारांची आरोग्य विभागावर टीका, सरकारला दिला घरचा आहेर

Akola News : अकोला जिल्हा रूग्णालयातील अस्वच्छतेमुळे आरोग्यमंत्र्यांना रूग्णालय पाहणी दौरा रद्द करावा लागला. महायुतीच्या आमदारांनी आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणाचा पाढा आरोग्यमंत्र्यांसमोर वाचला.

Yash Shirke

  • अकोला जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आरोग्यमंत्र्यांचा दौरा रद्द.

  • महायुती आमदारांनी आरोग्य विभागावर जोरदार टीका केली.

  • प्रकाश भारसाकळे यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनधी

अकोला : आज राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अकोल्याच्या एक दिवसीय दौर्यावर होतेय. या दौर्यात ते अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देणार होतेय. मात्र, रुग्णालयात स्वच्छता नसल्याने त्यांना आपली नियोजीत भेटच रद्द करावी लागली आहे. अकोला जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून रूग्णालय प्रशासनाला स्वत: आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील आमदार आणि जिल्हाधिकारी वर्षा मिना यांनी धारेवर धरलेय. आरोग्यमंत्र्यांचा दौरा दोन दिवसांपूर्वी येऊनही जिल्हा रुग्णालयात कोणतीही स्वच्छता नसल्याने अखेर आरोग्यमंत्र्यांवर पाहणी दौराच रद्द करण्याची नामुश्की ओढवलीय. या बैठकीत भाजप आमदार आणि मुख्य प्रतोद रणधीर सावरकर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हा रूग्णालयाच्या कारभारावर जोरदार टीका केलीय.

दरम्यान, याच आढावा बैठकीत उपस्थित अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आरोग्यमंत्र्यांसमोरच सरकारला घरचा आहेर दिलाय. अकोट आणि तेल्हारा तालुक्यात आरोग्य खात्याची कामगिरी अतिशय सुमार असल्याची टीका त्यांनी केलीय.

- सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची अकोला शासकीय रुग्णालयाकडं फिरवली पाठ..

- शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेमूळ सार्वजनिक मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट रद्द करण्यात आली..

- आबिटकरांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आज आरोग्य विभागाची बैठक घेतली.. सत्ताधारी आमदारांसह स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेचे संदर्भात तक्रारीचा पाढा वाचला..

- रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय सोनवने यांना रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर आमदारांचं अधिकाऱ्यांनी चांगलंच घेरलं..

प्रकाश भारसाकळे :

- भाजपचे आमदार प्रकाश भाळसाकळे यांनी दिला सरकारला घरचा आहेर...

- सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांसमोर आरोग्याच्या समस्यांचा भाजप आमदाराने वाचला आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेचा पाढा..

- अकोट आणि तेल्हारा तालुक्यात आरोग्य खात्याची परिस्थिती अतिशय वाईट..

- विशेषतः आदिवासी आणि सातपुडा पर्वतरांगाला लागून अलसेला भाग अनेक समस्यांनी ग्रस्त आहे, ज्यात अपुऱ्या पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधांची कमतरता, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव, सार्वजनिक आरोग्याच्या समस्या मांडल्या..

- मात्र, अधिकारी पाहिजे तसा प्रतिसाद आपल्याला देत नसल्याचा आमदार भारसाकळे यांचा आरोप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिमलगट्टा परिसरात वाघाची दहशत - वाघाच्या हल्यात 46 बकरे ठार

Christmas Gift : ख्रिसमस गिफ्ट पाहताच बच्चे कंपनी होईल खुश, 'हे' आहेत स्वस्तात मस्त ऑप्शन

महायुतीत अंतर्गत युद्ध! अमित शाह–शिंदे जवळीक, फडणवीस अडचणीत? संजय राऊतांचा खळबळजनक दावा|VIDEO

भीषण अपघात! भरधाव पिकअप टेम्पोनं महिलेला चिरडलं; घटना सीसीटीव्हीत कैद, टिटवाळा हादरलं

Dadar Station : मुंबईकरांची गर्दीपासून सुटका! 'या' महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर उभारणार एलिव्हेटेड डेक; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT