Akola Riots  saam tv
महाराष्ट्र

Akola Riots : अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश

Akola : अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला आहे. अकोला शहरातील हरिहरपेठ भागामध्ये मे २०२३ मध्ये मध्यरात्रीच्या वेळेस मोठी दंगल उसळली होती.

Yash Shirke

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी

Akola Riots Case : महाराष्ट्रातील अकोला शहरात मे 2023 मध्ये उसळलेल्या धार्मिक दंगली दरम्यान जखमी झालेल्या मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ यांच्या याचिकेवर सुनावणी झाली, आणि सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना तात्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणास "एफआयआर नोंदवण्यासाठी योग्य" असल्याचे म्हटले आहे. तसेच अकोला पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेये.

दरम्यान, ही याचिका 'अ‍सोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स' (APCR) च्या मदतीने दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 23 मे 2025 रोजी न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. वी. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर अकोला पोलिसांच्या पोलीस तपासात हलगर्जीपणा, घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन दिसून आले.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, पोलिस तपासात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. आणि याचिकाकर्त्याचे घटनात्मक अधिकार पायदळी तुडवले गेले आहेत. मोहम्मद अफजल यांचा आरोप आहे की, दंगलीदरम्यान त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती, तरीही पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली नाही. हा प्रकार रुग्णालयात मेडिकल लीगल केस म्हणून नोंदवला गेला होता, पण अकोला पोलिसांनी तो दुर्लक्षित केला.

सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश :

- एफआयआर नोंदवण्याचा आदेश:

महाराष्ट्र पोलिसांनी याचिकाकर्त्याच्या तक्रारीची तात्काळ एफआयआर नोंदवावी.

- या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या पथकात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांतील वरिष्ठ पोलिस अधिकारी असतील, जेणेकरून चौकशी निष्पक्षपणे होईल.

- नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या एसआयटीने तीन महिन्यांच्या आत चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करावा.

- ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा दाखवला, त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जावी.

न्यायाची नवी आशा :

या आदेशामुळे जखमी पीडित मोहम्मद अफजल यांना न्याय मिळण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. यापूर्वी नागपूर उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती, कारण चार्जशीट दाखल झालेली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, चार्जशीट दाखल झालेली असली तरीही निष्पक्ष चौकशीसाठी न्यायालय हस्तक्षेप करू शकते.

ज्येष्ठ वकिलांचा युक्तिवादात सहभाग :

या प्रकरणात याचिकाकर्त्यांची बाजू ज्येष्ठ वकील अभय ठिपसे, अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड फौजिया शकील, तसेच अ‍ॅडव्होकेट शोएब इनामदार आणि मोहम्मद हुजैफा यांनी मांडली.

नेमक काय घडलं होत 2023 मध्ये?

अकोला शहरातल्या हरिहरपेठ भागात 'मे 2023 मध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली होती. दोन्ही गटांमधील 10 जण जखमी झाले होते. तसेच दोन पोलीसही जखमी झाले आहे. त्यावेळी कलम 144 लागू करण्यात आलं होती. दंगलखोरांनी पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याचं बोलल्या जात होत. इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण झाली, त्यानंतर दंगल उसळली असल्याचे कारण समोर आलं होतं. शहराच्या काही भागात अचानक दगडफेक शुरू झाली. परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : बंगल्यासाठी डान्सरकडून बीडच्या माजी उपसरपंचाचा घात? मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा Video समोर

Cake: गोडाची आवड ठरते घातक, केकचे दुष्परिणाम जाणून घ्या

Navi Mumbai Video : पोलीस अधिकाऱ्यानं रीलच्या नादात काय केलं बघा? VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात

Shrileela Saree Collection: श्रीलीलाच्या ट्रेंडी आणि क्लासिक साड्यांचे कलेक्शन पाहिलेत का? तुम्हीही करु शकता लूक कॉपी

SCROLL FOR NEXT