Crime News
Crime News saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : 3 दिवसांच्या मुलीवर अंत्यसंस्कार न करताच बापाने मृतदेह रस्त्यावर दिला फेकून, संतापजनक घटना

अॅड. जयेश गावंडे

Akola Cirme News : अकोल्यातून (Akola) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका निर्दयी बापाने अंत्यसंस्कार न करताच मृत स्त्री जातीचे अभ्रक रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली आहे. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात ही धक्कदायक घटना घडली आहे.जन्मतःच प्रकृती गंभीर असलेल्या तीन दिवसांच्या चिमुकलीचा अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील (Hospital) एनआयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Akola Latest Crime News In Marathi)

अंत्यसंस्कारासाठी डॉक्टरांनी चिमुकलीचा मृतदेह पित्याच्या ताब्यात दिला खरा, पण बापाने अंत्यसंस्कार न करताच तिला रस्त्यावर फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार वैद्यकीय महाविद्यालय परिसरात घडला आहे.

महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवार भिंतीजवळ अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती, पोलिसांना मिळताच त्यांनी सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांच्या मदतीने अर्भकाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात ते स्त्री जातीचे अभ्रक असून ते मृत असल्याचे सांगण्यात आले.

तपासादरम्यान या अर्भकाचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी या चिमुकलीचा मृतदेह मुलीचे वडील ज्ञानेश्वर डोरळे यांच्याकडे सोपवला होता मात्र अंत्यसंस्कार न करताच जन्मदात्या ज्ञानेश्वर डोरळे याने तिला रस्त्यावर फेकले. पोलिसांनी ज्ञानेश्वर डोरळे रा.यवतमाळ जिल्हा याला ताब्यात घेतले नंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर मांडला. त्या मृतदेहावर पोलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi in Solapur : स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाही, मग मोदींचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar On PM Modi: पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केला; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाल का? तानाजी सावंतांच्या टीकेवर ओमराजेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT