First Indian Voter Death : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचे निधन

106 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
First Indian Voter Death
First Indian Voter DeathSaam Tv

Indian First Voter Dies : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचे आज सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशातील किन्नौरचे रहिवासी असलेले नेगी 106 वर्षांचे होते. त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले होते. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरुवात झाली होती.  हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक आहे, त्यासाठी त्यांनी शेवटचं मतदान केलं आहे.

देशातील सर्वात वयस्कर मतदार श्याम सरन नेगी नुकतेच रिटर्निंग ऑफिसरला 12-डी फॉर्म परत करून प्रसिद्धीझोतात आले होते. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे सांगत जुन्या मतदाराने निवडणूक आयोगाचे फॉर्म परत केले होते. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कल्पाच्या घरी जाऊन पोस्टल मतदान घेतले.

First Indian Voter Death
Nashik : नाशकात हावडा मेलच्या बोगीला भीषण आग; प्रवाशांची पळापळ, अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी

२ नोव्हेंबर रोजी केलं शेवटचं मतदान

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी 80 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी पोस्टल बॅलेट पेपरद्वारे मतदान केले जात आहे. पहिल्या टप्प्यात १ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत हे मतदान झाले. दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी देशातील पहिले मतदार असलेल्या नेगी यांनी शेवटचं मतदान केले.

३३ वेळा मतदान केलं मतदान

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून ओळखले जाणारे नेगी यांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी ३३ वेळा मतदान केले.  त्यांनी बॅलेट पेपरपासून ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला.

1951 मध्ये केले पहिले मतदान

देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951 साली पार पडली. त्यावेळी ही निवडणूक पाच महिने चालली होती. भारताचे पहिले मतदार म्हणून श्याम सरण नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. 1951 मध्ये नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. यानंतर त्यांनी एकाही निवडणुकीत आपला सहभाग सोडला नाही.

असे ठरले देशातील पहिले मतदार

नेगी यांनी सांगितले होते की, "माझ्या गावाच्या शेजारच्या गावातल्या शाळेत निवडणुका घेण्यासाठी मी ड्युटीवर होतो. पण माझं मत माझ्या गावी, कल्पात होतं. मी आदल्या रात्री माझ्या घरी आलो होतो. पहाटेचे ४ वाजले होते. गोठवणारी थंडी होती. सकाळी ६ वाजता माझ्या मतदान केंद्रावर पोहोचलो. तेव्हा तिथे एकही मतदार नव्हता. मी मतदान पक्षाची वाट बघत होतो. ते आल्यावर मी त्यांना विनंती केली की मला लवकर मतदान करू द्या, कारण त्यानंतर मला शेजारच्या 9 किमी अंतरावर असलेल्या मुरंग गावात निवडणुका घेण्यासाठी जायचे होते.त्यांना माझी अडचण आणि उत्साह समजला. म्हणून त्यांनी मला नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी मतदान करण्याची परवानगी दिली.अशा प्रकारे मी मतदानाचा हक्क बजावला आणि देशाचा पहिला मतदार ठरले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com