Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : पत्नीचे मावस भावासोबत अनैतिक संबंध; पतीला कळताच घडलं भयंकर

अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा दोघांनी मिळून काटा काढला. अकोल्यातील खदान पोलिस स्टेशन परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime News : पतीच्या मावसभावासोबत पत्नीचे सूत जुळले. कालांतराने दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला की त्यांना नात्याचे कुठलेही भान राहिले नाही. अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा दोघांनी मिळून काटा काढला. अकोल्यातील (Akola) खदान पोलिस स्टेशन परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी आणि आरोपी मावसभावाला ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

अजय मांजरे आणि मृत व्यक्तीची पत्नी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, खडकी परिसरात राहणाऱ्या आकाश इंदोरे याचा 20 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात खदान पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक श्रीरंग सणस यांनी तपास सुरू केल्यावर धक्कादायक हे धक्कादायक वास्तव (Crime News) समोर आले. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा समोर आले. आकाश इंदोरे याचा मावसभाऊ अजय मांजरे हा सातत्याने घरी यायचा. यामुळे अजय आणि आकाशची पत्नी यांच्यात नजरभेट झाली.

हळूहळू संवाद वाढला. जवळीकता निर्माण झाली आणि सूत जुळले. परंतु आता पती प्रेमात अडसर ठरू लागला. त्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या करून त्याने आत्महत्या केल्याचे भासविले. परंतु त्यांचे हे बिंग 25 दिवसांनी शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. खदान पोलिसांनी उघडकीस आणून पत्नी आणि पतीचा मावसभाऊ अजय माजरे याला अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

Dhaka Blast : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये गजबजलेल्या मार्केटमध्ये मोठा स्फोट; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Chocolate balls: न्यू एयर सेलिब्रिशनसाठी काही तरी खास बनवायचं आहे? मग घरच्या घरी बनवा टेस्टी चॉकलेट बॉल्स रेसिपी

सक्षम ताटेची आई आणि प्रेयसी आचलचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT