Maharashtra Weather : शेतकऱ्यांनो सावधान! राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; कुठे कुठे होणार पाऊस? वाचा...

येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांत पुन्हा अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Weather Updates
Weather UpdatesSaam TV

Maharashtra Weather Updates : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे राज्यात पावसाचं पोषक वातावरण तयार झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा धास्तावला आहे. अशातच येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांत पुन्हा अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

Weather Updates
Aurangabad Crime : २२ वर्षीय मुलीसोबत मांत्रिकाचं क्रूर कृत्य; धक्कादायक घटनेनं औरंगाबादेत खळबळ

बुधवारी (१४ डिसेंबर) राज्यातील काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले, वाहतूक कोंडी झाली तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. काहीकाळ शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. हवामान खात्यात पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

बुधवारी नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा (Weather Updates) फटका बसला. पंचवटी, सिडको, गंगापूररोड, इंदिरानगरसह नाशिकरोड, विहितगाव, लॅमरोड भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. तर मायको सर्कल, मुंबईनाका, गंगापूररोड, दहिपूलसारख्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

Weather Updates
Petrol Diesel Price : कच्चे तेल पुन्हा २ डॉलरने महागले, आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?

बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा ,मोताळा तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. यामुळे खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील नदीला हिवाळ्यात पूर आला आहे. तर अनेक भागात पावसाने कांदा , हरभरा पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील (Maharashtra Weather)  इंदापूर शहर आणि तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून पिकांवर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com