Akola Crime Saam Tv
महाराष्ट्र

Akola Crime : ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव लागला जिव्हारी; पठ्ठ्याने काढली थेट तलवार अन्.., खळबळजनक घटना

पातूर तालुक्यातील खामखेड येथे एका इसमाने हातात तलवार घेऊन दहशत माजवल्याने गावात एकच खळबळ उडाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला - पातूर तालुक्यातील खामखेड येथे एका इसमाने हातात तलवार घेऊन दहशत माजवल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. नेमकेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat) पराभव झाल्याचे जिव्हारी लागल्याने पराभूत उमेदवार समर्थकाने हातात तलवार घेऊन मतदारांना मत का दिले नाही, आता सर्वांचा हिशोब होईल असे म्हणत गावात चांगलाच उच्छाद मांडला होता. (Akola Crime News)

पातूर (Patur) तालुक्यातील ग्राम खामखेड येथील रहिवासी सुरेश धोंडूराम गुंजकर हा हातात तलवार घेऊन गावात शिवीगाळ करत एका घरासमोर आला असता कुसुम रामदास शेळके या वयोवृद्ध महिलेने तू माझे घरासमोर येऊन कोणाला व का शिवीगाळ करत आहेस अशी विचारणा केली असता सुरेश गुंजकर याने सदर महिलेवर हल्लाबोल करून तिचा हात पिरगाळून झटापट केली.

या झटापटीत सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून कुठेतरी पडल्याने त्या वयोवृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता कृष्णा काळे रा.खामखेड यास सुरेश गुंजकर याने धक्काबुक्की करीत असताना कृष्णा यांच्या छातीजवळ तलवार लागल्याने केवळ त्याचे दैव बलवत्तर म्हणूनच फक्त खरचटले गेले.

खामखेड ग्रामपंचायत मध्ये मागील तीस वर्षांपासून गुंजकर परिवारातीलच सरपंच निवडून येत होता,अशे असतांना यावेळेस पहिल्यांदा त्यांचा पराभव झाल्यामुळे सुरेश गुंजकर याच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने त्याने हातात तलवार घेऊन गावातील मतदारांनी आम्हाला मतदान केले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे

सदर प्रकरणी कृष्णा काळे यांचे फिर्यादीवरून आरोपी सुरेश धोंडूराम गुंजकर रा.खामखेड याच्याविरोधात पातूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी फरार असून आरोपीचा शोध व अधिक तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT