Akola 11 Year Old girl Physically Abused  Saam TV
महाराष्ट्र

Akola Crime News: संतापजनक! ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, सिगारेटचे चटके देत केसही कापले; काळीमा फासणारी घटना

Akola Crime News: अकोला शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ११ वर्षीय शाळकरी मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने चाकूचा धाव दाखवून वारंवार अत्याचार केला.

Satish Daud

Akola 11 Year Old girl Physically Abused

अकोला शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ११ वर्षीय शाळकरी मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने चाकूचा धाव दाखवून वारंवार अत्याचार केला. शहरातील कैलास टेकडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, ११ वर्षीय पीडित मुलगी कैलास टेकडी (Akola Crime News) परिसरात राहते. पीडितेचे वडील मोलमजुरी करतात. एकेदिवशी पीडितेच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी तिच्या घरामध्ये शिरला. चाकूचा धाक दाखवून त्याने पीडितेवर अत्याचार केला.

याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी (Crime News) सुद्धा दिली. या प्रकारानंतर पीडिता घाबरली तिने याची वाच्यता कुणाकडे केली नाही. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने पीडितेचं वारंवार लैगिंक शोषण केलं. इतकचं नाही, तर आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटकेही दिली.

आरोपीने कात्रीच्या सहाय्याने पीडितेचे केस देखील कापले. दिवसेंदिवस आरोपीचं कृत्य वाढत असल्याने पीडितेने या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. मुलीवर बलात्कार झाल्याचं कळताच आई वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. या घटनेनंतर वंचित बहुजनक आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी खदान पोलिसांकडे केली. या संपूर्ण प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT