Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola Crime : दारू पाजून ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक अत्याचार; अकोल्यात संतापजनक प्रकार

अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केलं.

जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्ह्यात अतिशय संतापजनक घटना समोर आली, दोन जणांनी मूकबधिर असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला दारु पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केलाय. दरम्यान या प्रकरणी चान्नी पोलिसांनी गुन्हे दाखल करत अत्याचार करणाऱ्या या दोघांनाही गजाआड केलं आहे. (Akola Crime News)

प्राप्त माहितीनुसार,अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव मधील मूकबधीर असलेल्या ६५ वर्षीय महिलेला विनोद लठाड आणि निलेश बोरकर या दोघांनी दुचाकी वाहनावर बसवून नेले. त्यानंतर तिला धमकावून बळजबरीने दारु पाजली. अन् तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर तिला सोडून दिले.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर वृद्ध महिला प्रचंड घाबरली. त्यानंतर पीडितेने आपल्यावर घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला. त्यानंतर नातेवाइकांनी पीडित महिलेला घेवून चान्नी पोलीस स्टेशन गाठले अन् फिर्याद दाखल केली. यावरून चान्नी पोलिसांनी सावरगाव येथील आरोपी विनोद लठाड व नीलेश बोरकर या दोन जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. (Akola Todays News)

पोलिसांनी दोन आरोपींना अवघ्या दोन तासात अटक केली. आज या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली. या संदर्भात अधिक तपास मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन, सुधाकर करवते, दत्तात्रय हिंगणे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT