अकोला: पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात 'वंचितची' पोलिसांत तक्रार...
अकोला: पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात 'वंचितची' पोलिसांत तक्रार... जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोला: पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात 'वंचितची' पोलिसांत तक्रार...

अॅड. जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून (Akola Zilla Parishad) जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Akola Guardian Minister Bachchu Kadu) यांनी 1 कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार करून पालकमंत्री कडू यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत यंत्रणांचा यासाठी उपयोग केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला आहे. बोगस कागदपत्र तयार केल्याची पोलिस तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार (Case) दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी वंचितने बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. (Akola: Complaint lodged against Guardian Minister Bachchu Kadu)

हे देखील पहा -

अकोला जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना मागविलेल्या प्रस्तावानुसार ता. १० मार्च २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेवून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रस्तावामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने काम बदल करताना जिल्हा परिषद यंंत्रणेची मान्यता घेतली नाही. परस्पर स्वतःच्या लेटर हेडवर कामांमध्ये बदल करण्यात आला. काम बदल करण्याचा अधिकार जिल्हा नियोजन समितीला नाही. असे असतानाही जिल्ह्यातील तीन रस्ते जे मुळात शासनाच्या लेखी अस्तित्वातच नाही व ज्यांना ग्रामीण रस्ते म्हणून शासनाकडून कोणताही क्रमांक दिला नाही, अशा रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियतव्यय मंजूर केला. या कामांचा कार्यारंभ आदेशही काढण्यात आला.

जे रस्ते अस्तित्वातच नाही अशा रस्त्यांसाठी निधी मंजूर करून त्यांच्या कामाचे कार्यरंभ आदेश काढणे, काम जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील असताना ते इतर यंत्रणांकडून करून घेण्यासाठी वळती करणे व शासन निधीची अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हे (Crime) दाखल करण्याची मागणी वंचित ने केलीय आहे. या प्रकरणावर वंचित ने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT