School Saam Tv
महाराष्ट्र

School: सकाळच्या सत्रात शाळा भरवा; वाढत्या तापमानामुळं जिल्हाधिका-यांचा आदेश

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिनस्त शाळांमध्ये आवश्यक ते नियोजन करावे,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोला (akola) जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेले तापमान (summer season) आणि त्याचा विद्यार्थ्यांचा (student) तसेच नागरिकांच्या आरोग्यावर (health) होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता जिल्ह्यातील इयत्ता पहिले ते सातवीच्या सर्व शाळांची (school) वेळ १८ एप्रिलपासून सकाळी सात ते साडे अकरा अशी करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा (nima arora) यांनी दिले आहेत. (akola latest marathi news)

जिल्ह्यातील महापालिका, पालिका, नगर पंचायत तसेच ग्रामीण भागातील तसेच सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या खाजगी, शासकीय, निमशासकीय शाळांनी विद्यार्थ्यांच्या काळजी घ्यावी असेही आदेशात नमूद केले आहे.

त्यासाठी तापमानाची तीव्रता लक्षात घेता शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाय योजाना कराव्यात. मनपा आयुक्त, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांमध्ये आवश्यक ते नियोजन करावे असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT