त्यांनी सांगायचा अवकाश ED ची धाड पडतीच : छगन भुजबळ

भाजपला सरकार पाडण्याची खुप घाई झाल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.
chhagan bhujbal
chhagan bhujbalsaam tv
Published On

अकोला : भाजपच्या (bjp) नेत्यांनी सांगितल्याशिवाय ईडीची (enforcement directorate) धाड पडत नाही. एखादा भाजपमध्ये आला की त्याच्यावर ईडीची कारवाई हाेत नाही अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (ncp) नेते अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी (akola) येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर केली. (chaggan bhujbal latest marathi news)

मंत्री छगन भुजबळ हे अकोल्यात एका विवाह सोहळ्यासाठी आले हाेते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले जाे भाजपच्या विरोधात बोलतो त्याच्यावर ईडीची धाड पाडली जाते. भाजप सांगेल त्याप्रमाणे ईडी कारवाई करते. एकदा का ईडीच्या कारवाईत एखादा अडकला की त्यात जामीन मिळत नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे हा राक्षसी कायदा असून हा सर्वांनी म्हणजेच विरोधकांनीही एकत्र येत रद्द करण्याची मागणी केली पाहिजे असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

chhagan bhujbal
Pankaja Munde: 'मविआ' ने महाराष्ट्र भ्रष्टाचारानं पाेखरला : पंकजा मुंडे

दरम्यान एकीकडे महागाईमुळे जनता त्रस्त आहे. परंतु या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. ईडीचा वापर करून एखाद्यास संपवलं जात आहे. भाजपला सरकार पाडण्याची खुप घाई झाल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

chhagan bhujbal
Akola: वाशिम बायपास जवळ भीषण आग; गॅरेजचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
chhagan bhujbal
Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर
chhagan bhujbal
आता जामीन मिळताच कैदी Jail मधून लगेच येईल बाहेर; आज FASTER झाले लाॅन्च

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com