akola, civil line police station, love saam tv
महाराष्ट्र

Akola News : 3 वर्ष प्रेमसंबंध, अचानक ताे मी नव्हेचची भूमिका; परिचारिकेची पाेलीसांत धाव, जवानावर गुन्हा दाखल

सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यातून गुन्हा दाखल.

जयेश गावंडे

Akola Crime News : एका परिचारिकेशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून सिव्हिल लाइन पोलीसांनी (civil line police station) सैन्य दलातील एका जवानावर (कलम 376) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पाेलीस तपास करीत आहेत. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील (akola) शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या युवतीचे भारतीय सैन्यातील एका जवानासोबत प्रेमसंबंध जुळले. सैनिकाने या परिचारिकेला लग्नाचे आमिष दाखवून अनेक ठिकाणच्या हॉटेल, लॉजवर नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असे तिने तक्रारीत म्हटलं आहे.

परिचारिकेने लग्नाचा तगादा लावला असता संशियत आरोपी युवक काही कारण पुढे करायचा आणि लग्न करायचे टाळायचा. ही बाब युवतीच्या लक्षात आली. तिने लग्नासाठी त्याचा पिच्छा पुरवला. परंतु त्याने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली.

त्यानंतर युवतीने सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात धाव घेतली. युवतीच्या तक्रारीनुसार जवानावर (कलम 376) गुन्हा दाखल केला आहे. पाेलीस तपास सुरु असल्याची माहिती सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाबा आढाव यांच्या निधनामुळे बुधवारी मार्केट बंद राहणार

Accident : अहमदपूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! दोन तरुणांचा मृत्यू; सीसीटीव्ही फुटेज समोर

Onion Storage Tips: कांद्यांना कोंब फुटतात? नरम पडतात? ही 1 सिंपल ट्रिक, महिना भर राहतील चांगले

Vande Bharat Express : १६० चा वेग, विमानासारखा अलिशान प्रवास, पहिली वंदे भारत स्लीपर या मार्गावर धावणार, तारीख नोट करा

Colon cancer: त्वचेवर दिसणारे हे संकेत दर्शवतात कॅन्सरचा धोका, वेळीच ओळखा चेहऱ्यावर दिसणारे बदल

SCROLL FOR NEXT