AKOLA BALAPUR MINOR GIRL CASE: MAIN ACCUSED PAWAN WADGAWE ARRESTED FROM NANDED AFTER 22 DAYS Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : अकोला हादरलं! पोलिसाने घरमालकाच्या मुलीवर केला अत्याचार; २२ दिवसानंतर असा सापडला जाळ्यात

Akola Crime news : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला २२ दिवसांनंतर नांदेडमधून अटक करण्यात आली.

Alisha Khedekar

  • अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे धक्कादायक घटना

  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

  • पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला २२ दिवसांनंतर नांदेडमधून अटक

  • या प्रकरणातील तपासाला वेग

अक्षय गवळी, अकोला

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि तिच्या आत्महत्येप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला अखेर पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल २२ दिवस तो फरार होता. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पवन वडगावे याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या धक्कादायक घटनेनंतर संबंधित मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती. पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी बाळापूरमधील अकोला नाका रस्त्यावर मुलीच्या मृतदेहासह रास्ता रोको आंदोलनही केले होते.

दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. मागील २० दिवसांपासून हैदराबाद, कोईम्बतूर, बेंगळुरू, मुंबई, नांदेड आणि हिंगोली येथे आरोपीच्या नातेवाईक व मित्रांकडे चौकशी करण्यात आली.

आरोपीने मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद केल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. तांत्रिक तपास, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर नांदेडमध्ये सापळा रचून पवन वडगावे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील तपास अधिक वेगाने सुरू असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

नेमकं काय घडलं ?

पोलीस ऑफिसर पवन वडगावे हा पीडित मुलीच्या घरी भाड्याने राहत असल्याची माहिती आहे. याचदरम्यान त्याची घाणेरडी नजर घरमालकाच्या मुलीवर पडली. घरात कोणीही नसताना आरोपीने मुलीवर अत्याचार केला. या अत्याचारानंतर पीडित मुलगी डिप्रेशनमध्ये गेली. या डिप्रेशनमध्ये तिने स्वतःचे आयुष्य संपवले. दरम्यान ही घटना समजताच कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तब्बल २२ दिवसांनी पोलीस ऑफिसर असलेल्या पवनला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेनंतर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाकिस्तानचे झाले २ तुकडे? नव्या देशाची स्थापना, जाहीर केला स्वतःचा स्वातंत्र्यदिन; शाहबाज शरीफ सरकार हादरले

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्व शोकसागरात

Pizza digestion time: पिझ्झा खाल्ल्यानंतर तो पचायला किती वेळ लागतो?

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यातील 83 प्रकल्पात केवळ आठ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Devendra Fadnavis: 'माझा पुतण्या पंतप्रधान होणार'; मुख्यमंत्र्यांच्या काकांना विश्वास

SCROLL FOR NEXT