Alisha Khedekar
दिवसातून 2–3 वेळा स्वच्छ किंवा कोमट पाण्याने डोळे धुवा. त्यामुळे घाण, धूळ आणि चिकटपणा कमी होण्यास मदत होते.
डोळ्यांना हात लावण्यापूर्वी साबणाने हात धुवा. घाणेरड्या हातांमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
सतत डोळे चोळल्याने जळजळ, लालसरपणा आणि संसर्ग वाढू शकतो. शक्यतो ही सवय टाळा.
डोळे पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ रुमाल किंवा टिश्यू वापरा. वापरलेला रुमाल पुन्हा वापरू नका.
मोबाईल किंवा संगणकाचा जास्त वापर टाळा. मध्ये-मध्ये डोळ्यांना काही मिनिटे आराम द्या.
धूळ, धूर किंवा प्रदूषणात जाताना चष्मा वापरा. यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घ्यावा