The overturned 407 tempo after a fatal accident on Akola–Daryapur road. saam tv
महाराष्ट्र

Akola Accident: अकोल्यात 407 टेम्पोचा भीषण अपघात, दोन शेतमजुरांचा जागीच मृत्यू

Akola Tempo Accident : अकोला-दर्यापूर रस्त्यावर झालेल्या भीषण टेम्पो अपघातात दोन शेतमजूरांचा मृत्यू झालाय. ११ जण जखमी झालेत. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

Bharat Jadhav

  • अकोला–दर्यापूर रस्त्यावर ४०७ टेम्पोचा भीषण अपघात.

  • दोन शेतमजुरांचा जागीच मृत्यू, ११ जण जखमी.

  • जखमींमध्ये चार मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोल्यातील दर्यापूर रस्त्यावर ४०७ टेम्पोचा भीषण अपघात झालाय. या अपघातात २ शेतमजूर जागीच ठार झालेत तर ११ जण जखमी झालेत. जखमींमध्ये सर्व शेतमजूर असून यातील चार मुलांची स्थिती गंभीर आहे. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने टोम्पो पलटी झाला. सर्व जखमींना तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

कापूस वेचणी केल्यानंतर सर्व शेतमजूर दर्यापूरकडे परतीच्या प्रवास करत होते. त्यावेळी ही दुर्घटना झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून यात एका महिला आणि पुरुष आहे. मून्नीबाई जांभेकर आणि मनिष कासदेकर असं अपघातात मृत व्यक्तींचे नावे आहेत. तर चार जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक

शुक्रवारी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर साडेपाच वाजेच्या सुमारास मांजरसुंबा घाटात एका भीषण अपघाताची घटना घडली होती. सोलापूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल टँकरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे डिझेलचा टँकर तात्काळ उलटला.

टँकर डिझेलने भरलेला असल्यामुळे या आगीने काही क्षणातच भयंकर रौद्ररुप धारण केलं. या आगीमुळे महामार्गावरील दोन्ही लेनचे वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मांजरसुंबा महामार्ग पोलीस आणि बीड ग्रामीण पोलीस आणि नेकनुर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT