Akola Accident News Saam tv
महाराष्ट्र

Akola Accident News: वडील ह्रदयविकाराच्या झटक्याने गेले, पार्थिव घरी नेताना मुलालाही मृत्युने गाठलं

Akola News: बाप-लेकाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Akola Murtijapur Taluka Accident News: वडिलांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. मुलगा जीवाच्या आकांताने त्यांना रुग्णालयात घेऊन पळाला. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. मनावर दु:खाचा मोठा दगड ठेवून मुलगा वडिलांचे पार्थिव गावाकडे घेऊन निघाला. रुग्णवाहिकेच्या पाठीमागे तो दुचाकीवरून निघाला असता, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने त्याला जोरदार धडक दिली. (Latest Marathi News)

त्याला रुग्णालयात उपचासाठी दाखल केलं असता, त्याचा सुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना ३ जून रोजी सकाळी अकोला (Akola News) जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातल्या सिरसो फाट्याजवळ घडली. बाप-लेकाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

जानराव जमनिक (वडील) आणि सिद्धार्थ जमनिक (मुलगा) अशी मृत्युमुखी पडलेल्या बाप लेकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यांचे वडील जानराव यांना आज शनिवारी ह्रदय विकाराचा झटका आला. त्यांना उपचारार्थ मूर्तिजापुरात आणले असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  (Maharashtra Political News)

दरम्यान, त्यांचे पार्थीव गावाकडे पाठवून स्वतः अंतिम संस्काराचे साहित्य मागून दुचाकीने गावाकडे जात असताना दर्यापूरकडून विरुद्ध दिशेने भरधाव येणारा टिप्परने सिद्धार्थच्या दुचाकीला जबर धडक (Accident) दिली. या घटनेत सिद्धार्थ गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत सिद्धार्थ यांना मूर्तिजापुरातील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची सुद्धा प्राणज्योत मालवली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT