Tragedy in Akola: Devotee killed, three injured in road accident while returning from Ganesh Visarjan. saam tv
महाराष्ट्र

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Akola Road Mishap: गणेश विसर्जन करून परतणाऱ्या भाविकांना पातूर-अकोला रस्त्यावर एक भीषण रस्ता अपघात झालाय. या अपघातात अकोल्यातील शिवसेना वसाहत येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले.

Bharat Jadhav
  • अकोल्यातील पातूर-अकोला रस्त्यावर अपघात.

  • गणेश विसर्जनावरून परतताना अपघात झाला.

  • एका तरुणाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी.

गणेश विसर्जन करून परत येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात झालाय. अकोल्यातल्या पातूर-अकोला रस्त्यावरील घटना. अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. तर 3 जण गंभीर जखमी झालेत. मृत अन जखमी सर्वजण अकोल्यातील शिवसेना वसाहत भागातील रहिवासी आहेत.

जय बजरंग गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाच कापशी तलावावरून गणेश विसर्जन करण्यात आलं. विसर्जन करून परतत असताना हा अपघात झाला. मृत पावलेला तरुण आणि जखमी झालेले चौघेजण एकाच दुचाकीवर प्रवास होते. त्यावेळी दुचाकीला कारने जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात अक्षरशः दुचाकीचा चुराडा झालाय.

नंदुरबारमध्ये गणेश भक्तांच्या कारला अपघात

गणेश विसर्जनानंतर परत येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाला अपघात झालाय. प्रकाशाहून नंदुरबारच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहन आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातात मोटरसायकलस्वाराचा पाय तुटल्याची माहिती मिळालीय. अपघातात चारचाकी वाहन शिरलं थेट शेतात जात पलटी झाले. चारचाकी वाहनातील दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT