Solapur Latest Marathi News Saam TV
महाराष्ट्र

दीपकची पत्रिका देवापर्यंत पोहोचलीच नाही; नवरदेवासह तिघांचा अपघातात दुर्देवी मृत्यू

मयत दीपक बुचडे याचं 18 जून रोजी लग्न होणार होतं.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : अक्कलकोट (Akkalkot) गाणगापूर (Ganagapura) रस्त्यावर बुधवारी (8 जून) रात्री एक भयंकर घटना घडली आहे. लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवाच्या कारला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत नवरदेवासह त्याच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-दुधनी रस्त्यावरील बिंजगेरच्या दर्ग्याजवळ हा सर्व भीषण प्रकार घडला आहे. (Solapur Latest Marathi News)

दीपक बुचडे वय (29), आकाश साखरे (वय 28) आणि आशुतोष माने (वय 23) अशी मृत्युमुखी पडलेल्या मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक यांच्या नातेवाईकांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत दीपक बुचडे याचं 18 जून रोजी लग्न होणार होतं. त्यामुळे त्याची लग्नपत्रिका देवाच्या द्वारी ठेवण्यासाठी तो बुधवारी त्याच्या दोन मित्रांसह अक्कलकोटला निघाला होता.वाटेत त्यांनी तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानी आणि अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शनही घेतलं. मात्र,गाणगापूरच्या दत्त दिगंबरांचं दर्शन घेण्याअगोदर या तिघांवर काळाने घाला घातला.

गाणगापूरच्या दिशेनं जात असताना अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने दीपकच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या घटनेत दीपक आणि त्याच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लग्नकार्य अवघ्या काही दिवसांवर असताना, दीपकचा असा अपघाती मृत्यू झाल्यानं संपूर्ण हिंजवडी आयटीनगर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT