bailgada sharyat, khed saam tv
महाराष्ट्र

Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीवरुन नवा वादंग, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जाहीर केला महत्त्वपूर्ण निर्णय

Khed News : या बैठकीनंतर 200 पेक्षा अधिक बैलगाडा मालकांनी संघटनेस पाठींबा दिला.

रोहिदास गाडगे

Akhil Bhartiya Bailgada Sanghatna Meeting :

बैलगाडा शर्यतीच्या टोकन फी परत न करणा-या घाटात बैलगाडा धावणार नाही अशी ठाम ठाम भूमिका आज अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जाहीर केली. हा निर्णय बैलगाडा मालकांच्या हितासाठी घेतल्याचे संघटनेने नमूद केले. (Maharashtra News)

बैलगाडा शर्यतीच्या निकषात सुप्रिम कोर्टाकडून शर्यत संपल्यावर टोकन फी परत करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणारे आयोजक बैलगाडा मालकांना टोकन फी परत करत नाही. २ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत बैलगाडा मालकांची टोकन फी वर आयोजक डल्ला मारतात अशा तक्रारी अखिल भारत बैलगाडा संघटनेस प्राप्त झाल्या.

यावर आखिल भारतीय बैलगाडा संघटना आक्रमक भुमिकेत आली. दरम्यान आयाेजकांनी टोकन फी परत करणार नसल्याचे ठामपणे सांगितल्याने बैलगाडा शर्यती भरविण्यावरुन पुन्हा वाद निर्माण होणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला.

संघटनेच्या बैठकीत झाला निर्णय

दरम्यान यानंतर संघटनेने घेतलेल्या बैठकीत बैलगाड्याचे आयोजन करताना अल्प टोकन फी आकारणी करुन टोकन फी परत (token fee for bailgada sharyat) केलीच पाहिजे असा निर्णय घेतला. यापुढे वैयक्तिक स्वार्थासाठी बैलगाडा शर्यतीला व्यवसायिक स्वरुप दिलं जाणा-या यात्रेत बैलगाडा शर्यती भाग न घेण्याचा एकमुखी निर्णय देखील आखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची माहिती संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत पावसाची दमदार हजेरी; रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी

Guru Purnima : यंदाची गुरुपौर्णिमा अत्यंत खास! ४ राशींवर होणार गुरूची कृपा, करिअरमध्ये मान सन्मान अन् पैशांचा पाऊस

Nashik Fort : ३,००० फूट उंचीवरील इगतपुरीजवळील 'हा' किल्ला पर्यटकांना करतोय आकर्षित, तुम्ही कधी जाताय?

Indian Railways: परभणीला केंद्राचं 163 कोटींचं गिफ्ट; रेल्वे प्रवास होणार सुसाट

Famous Actress : 'मांडीवर बसवलं, ओठांवर Kiss केलं अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत मामाचं भयानक कृत्य, ढसाढसा रडत मांडली व्यथा | VIDEO

SCROLL FOR NEXT