Akhil Bhartiy Marathi Natya Sammelan Beed: Saamtv
महाराष्ट्र

Uday Samant: मुंबई - गुवाहाटी राजकीय नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते एकनाथ शिंदेचं.. नाट्य संमेलनाच्या मंचावर उदय सामंतांची फटकेबाजी

Akhil Bhartiy Marathi Natya Sammelan Beed: शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन बीडमध्ये पार पडत आहे. या उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना उदय सामंत यांनी राज्याच्या सत्ता संघर्षावरुन जोरदार फटकेबाजी केली.

विनोद जिरे

Beed News:

शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन बीडमध्ये पार पडत आहे. या नाट्य संमेलनाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना उदय सामंत यांनी राज्याच्या सत्ता संघर्षावरुन जोरदार फटकेबाजी केली.

काय म्हणाले उदय सामंत?

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाट्यसंमेलनाच्या मंचावर बोलताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाचा उल्लेख करत जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. मुंबई - गूवाहाटी व्हाया सूरत या राजकीय नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, आणि निर्माते एकनाथ शिंदेच होते. त्यात त्यांची भूमिका मुख्य होती तर बारामती ते मंत्रालय या राजकीय नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अजित दादा पवार होते, असे उदय सामंत म्हणाले.

तसेच पुढे बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजकीय नाटक लिहिले. बारामती ते मंत्रालय या नाटकाच्या मुख्य भूमिकेत ते होते. आज महाराष्ट्रामध्ये तीन तीन नाटक घडली, त्यामधील आपण कलाकार आहोत," असेही उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

ठाकरेंना टोला...

"या नाटकात प्रमुख कलाकार म्हणून एकही जण नाराज होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असे म्हणत वऱ्हाड निघाले डावोसला म्हणून टीका केली. मात्र कोट्यावधीचे उद्योग महाराष्ट्रात घेऊन आलो," असा टोलाही त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना लगावला. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT