Ajit Pawar water statement 
महाराष्ट्र

Ajit Pawar : आधी दगडाचा वापर आता फ्लश, पाणी प्रश्नावरून अजित पवारांचा अनोखा सल्ला| VIDEO

Ajit Pawar water statement : अजित पवारांनी पाणी वापराबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांची तब्बल ९५ लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याचं समोर आलं आहे.

Bharat Mohalkar

Maharashtra water bill controversy : अजित पवारांनी पाण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलंय...दादा नेमकं काय म्हणालेत? अजित पवारांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.. पाणी प्रश्न गंभीर होण्यासाठी अजित पवारांनी अजब तर्क दिलाय.. हा तर्क काय आहे पुन्हा ऐका....

राज्यात सध्या पाण्याचा वापर वाढलाय. त्याची कारणं अजित पवारांनी सांगितलेत. मात्र एकीकडे सर्वसामान्यांना अजित पवार उपदेशाचे डोस पाजत असताना मंत्र्यांच्या पाणी वापराकडे साफ दुर्लक्ष करत आहेत..मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचं पाणी बील पाहिलं तर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत.... कारण शासकीय बंगल्यांची तब्बल 95 लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याचं समोर आलं होतं.. या मंत्र्यांचा पाणीवापर किती होतो? पाहूयात...

मंत्र्यांच्या बंगल्याची थकित पाणीपट्टी (2021-2023)

एकनाथ शिंदे, तत्कालिन मुख्यमंत्री, (नंदनवन)- 18 लाख 48 हजार

एकनाथ शिंदे, तत्कालिन मुख्यमंत्री (वर्षा बंगला) - 11 लाख 69 हजार

दीपक केसरकर (रामटेक) - 11 लाख 30 हजार

उदय सामंत (मुक्तागिरी) - 6 लाख 83 हजार

सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी) - 6 लाख 52 हजार

डॉ. विजयकुमार गावित (चित्रकुट) -5 लाख 19 हजार

अजित पवार (देवगिरी) - 4 लाख 38 हजार

देवेंद्र फडणवीस (मेघदूत) - २ लाख ७३ हजार

देवेंद्र फडणवीस (सागर) - 1 लाख 26 हजार

गुलाबराव पाटील (जेतवन) -1 लाख 18 हजार

राधाकृष्ण विखे पाटील (रॉयलस्टोन) - 92 हजार

सह्याद्री अतिथीगृह - 35 लाख 99 हजार

मंत्र्यांचे बंगले नेहमीच वादाची आगारं ठरतात,त्यात चहापान,नाष्टा आणि बंगल्याच्या सुशोभिकरणावर होणारी कोटीच्या कोटी उड्डाणे ही ठरलेलीच. त्याची डोळे फिरवणारी आकडेवारी समोर येताच सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळतं...मात्र हेच मंत्री जेव्हा मतदारांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करतात तेंव्हा म्हणावसं वाटतं...अहो मंत्री महोदय दूसरों को बुरा कहने से पहले, अपने गिरेबान में झांक कर देखो तो कोई बात बने।...एवढंच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Private Bus Fares: टॅव्हल्सचा मनमानी कारभार, दिवाळीत प्रवाशांची लूट सुरू; पुणे ते नागपूर प्रवासासाठी ₹4200 भाडे

Maharashtra News Live Update: अंधेरी स्थानकात तिकीट तपासनीसाला महिला प्रवाशाने चावा घेतला!

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचं पुन्हा नशीब चमकलं! मिळाली टी-२० टीमची कॅप्टन्सी, आता दोन ट्रॉफी जिंकण्याचं लक्ष्य

Rmayana Review: 'रामायण' थिएटरमध्ये का पाहावा? रणबीर कपूरचा अभिनय, यशचा रुबाब आणि चित्रपटातील 'या' खास गोष्टी जाणून घ्या

Shankarpali Recipe : शंकरपाळी फुलत नाही? मग पीठ मळताना वापरा 'ही' एक ट्रिक, होईल खारीसारखा खुसखुशीत

SCROLL FOR NEXT