Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दादा शिरुरमधून लढणार? अजित पवार विरुद्ध अशोक पवार सामना रंगणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी... उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बारामतीमधून नव्हे तर शिरूर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत, अशी सुत्रांची माहिती आहे.

Girish Nikam

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची कामगिरी खराब झाली. केवळ रायगडची जागा ते जिंकू शकले. दुसरीकडे शरद पवारांकडे सहानभूती जाऊन पवारांच्या राष्ट्रवादीचे ८ खासदार निवडून आले. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा बारामतीमधून झालेला पराभव हा दादांना सर्वात मोठा धक्का होता.

दुधानं तोंड पोळल्यामुळे आता विधानसभेला दादा ताकही फुंकून पित आहेत. बदलत्या राजकीय परीस्थितीमुळे अजित पवार शिरूरमधून लढण्याची शक्यताय. मित्रपक्ष भाजपही दादांच्या मदतीला धाऊन आलाय. भाजपकडील मतदारसंघ असूनही भाजपनं इथं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याच नाहीत. शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक पवार आहेत. शरद पवारांनी अशोक पवारांना मंत्री करण्याचं आश्वासन दिलंय.

अजित पवार यांनी शिरुरची निवड केली तर अजित पवार विरुद्ध अशोक पवार, असा सामना रंगणार हे निश्चित आहे. अजित पवारांनी जाहीर भाषणात अशोक पवारांवर निशाणा साधताना मंत्री दूरची गोष्ट आहे, तू आमदार कसा होतो तेच पाहतो, असं आव्हान दिलंय. शिरुरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न बाळगून आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार 1991 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून 2019 पर्यंत सलगपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. पण लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीमधील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे 2024 ची विधानसभा दादांसाठी सोपी नाही एव्हढं मात्र निश्चित.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा येणार

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT