विनोद पाटील, साम प्रतिनिधी
सा-या देशाचं लागलेल्या बारामतीची लढाई सुप्रिया सुळेंनी जिंकलीय. मात्र सुळेंचा आपले भाऊ अजितदादांविरोधातला लढा अजून संपलेला नाही. कारण लोकसभा निवडणुकीचं गुलालही अजून धुतलं गेलेलं नाही त्याआधीच सुप्रिया सुळेंनी दादांविरोधात आणखी एक रणशिंग फुंकलंय.
अजित पवारांचं वर्चस्व असलेला इंदापुरातील भवानीगरचा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना सुप्रिया सुळेंच्या रडारवर आलाय. या कारखान्याच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे सक्रीय होणार आहेत. हा कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा असा निर्धार व्यक्त करत अजितदादांना ताईंनी खुलं चॅलेंजच दिलंय.
बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव केला. अजित पवारांनाही या पराभवामुळे मोठा धक्का बसलाय. त्यांनी तसं बोलूनही दाखवलंय. बारामतीचा पराभवाचं आपल्यासाठी आश्चर्यकारक असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय.
बारामती लोकसभेच्या लढाईत ताईंनी दादांना जोरदार धक्का दिलाय. आता इंदापूरच्या साखर कारख्यान्यासाठी ताई मैदानात उतरल्या आहेत. गेल्या 20 वर्षांपासून अजित पवारांचं या कारखान्यावर वर्चस्व आहे. मात्र या दोन दशकात त्यांच्यासोबत काका आणि ताईंचीही ताकद होती. त्यामुळे बारामतीचा पराभवाची पुनरावृत्ती होणार की दादा कारखान्याच्या लढाईत त्याचा वचपा काढणार याची उत्सुकता आहे. मात्र या निमित्तानं पुन्हा दादा विरूद्ध ताईचा सामना पाहयला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.