shashikant shinde Saam tv
महाराष्ट्र

शरद पवारांकडून दादांच्या नेतृत्वाला मान्यता? शशिकांत शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट, VIDEO

shashikant shinde : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय...विलिनीकरणाबाबत अखेरच्या काही महिन्यांत अजितदादांनी काय सांगितलं होतं? दोन्ही राष्ट्रवादीचं नेतृत्व नेमकं कोणाकडे जाणार होतं? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

गेल्या दीड-दोन वर्षांपासून काका-पुतण्यांमधील विसंवाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. दोन पक्ष, दोन चिन्हे आणि दोन वेगळ्या विचारधारांना पाठिंबा... असं चित्र राज्यात उभं राहिलेलं असतानाच दादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय... शरद पवारांच्या मान्यतेनुसार 12 फेब्रुवारीला दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होणार असल्याचं विधान करत... दादांनी वेगळा पक्ष का स्थापन केला? याची कारणं ही सांगितलीत...

अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोटेनाटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले. अजितदादांना वेगळा गट स्थापन करावा लागला. त्याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे. झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची. या विचारानं दादा गेल्या 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण करायचं असा निर्धार करुन ते जयंत पाटील, पवारसाहेब आणि आमच्याशी बोलत होते.

महापालिका, जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली होती.

12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं असा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला. विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीची धुरा अजितदादांकडे सोपवण्याचा निर्णयही साहेबांसह सर्व नेत्यांनी केला. कार्यकर्त्यांची तर तीच अपेक्षा होती. पण काळानं घाला घातला. दादांचे दोन्ही पक्ष एकत्र आणण्याचं स्वप्न अपुरे राहिले. आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे. शशिकांत शिंदेंच्या दाव्याला अनिल देशमुखांनीही दुजोरा दिलायं..

दरम्यान शशिकांत शिंदेंच्या लेखावर आक्षेप घेत भाजपसोबत जाण्याची स्पष्ट भूमिका अजितदादांनीच मांडली होती, असं सुनील तटकरेंनी म्हटलयं... तर दुसरीकडे महायुतीतील मुख्य पक्षाला विश्वासात घेऊनच विलिनीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा करू, असंही तटकरेंनी अधोरेखित केलयं.

विलिनीकरणावरुन दावे प्रतिदावे केले जात आहेत... तर दादांच्या राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाचा चेंडू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कोर्टात टाकत आहेत. त्यामुळे विलिनीकरणाचा अंतिम निर्णय कधी होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT