bachchu kadu claims on Sharad Pawar-Ajit Pawar politics  SAAM TV
महाराष्ट्र

Sharad Pawar-Ajit Pawar : शरद पवार-अजित पवार भविष्यात एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघणार

Bachchu kadu Statement on Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Bachchu kadu Statement on Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यात राज्यातील एका बड्या नेत्यानं या दोन्ही नेत्यांसंदर्भात मोठा दावा केला आहे. शरद पवार आणि अजित पवार हे भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं भाकित या नेत्यानं केलं आहे. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा देश पातळीवरही सुरू आहे. अजित पवारांचा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा, शपथविधी, खातेवाटप आणि आता शरद पवार आणि अजित पवार यांची भेट हे मुद्द्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात दिल्लीतून शरद पवारांना ऑफर असल्याचा दावा राज्यातील काँग्रेसच्या नेत्याने केल्यानं खळबळ उडाली होती. मात्र, अशा चर्चांना काही अर्थ नाही, असं आधीच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. शरद पवारांबाबत बोलताना ते म्हणाले की, 'समुद्राची खोली मोजता येईल; मात्र शरद पवार यांची बुद्धी मोजता येत नाही. भाजप शरद पवार यांना आपल्या दबावाखाली ठेवणार की शरद पवार हे भाजपला दबावाखाली ठेवतील हे सांगता येत नाही.'

महाविकास आघाडीबाबत मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल, याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यावरही बच्चू कडू यांनी महत्वाचं भाष्य केले आहे. उद्या महाविकास आघाडीमधील कोण गळाला लागतील हे काही सांगता येत नाही. अजित पवार यांच्यामुळं शिंदेंचे राजकीय वजन कमी होईल, असे वाटत होते, पण आता शिंदेच पुरून उरत आहेत, असे कडू म्हणाले.

सत्तेत राहायचे असेल तर सर्वांना व्यवस्थित राहावे लागेल. आजच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला बोलावले नाही. फक्त मंत्र्यांनाच निमंत्रित केले आहे. असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक पक्ष आपापले राजकरण करत आहे. प्रत्येकाला आपण सत्तेत असावे असे वाटत आहे. लोक सत्तेला सलाम करतात. त्यामुळं प्रत्येक पक्षाला सत्तेत राहायचे आहे, असंही कडू म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit pawar : शरद पवारांसोबत युती करायचीच, आता अजित पवार स्वत: मैदानात उतरले; राष्ट्रवादीतील मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधून कृष्णराज महाडिक यांनी दाखल केला निवडणुकीचा अर्ज

Sleeveless Blouse Designs: स्लिव्हलेस ब्लाऊजची हटके स्टाईल, या 5 लेटेस्ट डिझाईन्स तुम्हाला उठून दिसतील

2025 Bollywood Songs : न्यू ईअर सेलिब्रेशन करण्यासाठी, 2025 मधील 'हि' सुपरहिट बॉलिवूड साँग एकदा लावाच

Veg Cutlet Recipe: न्यू ईअर पार्टीसाठी बनवा चविष्ट व्हेज कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT