ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हे वर्ष संपत असताना मनोरंजनातच्या दुनियेत अनेक सुपरहिट मुव्ही आणि त्यात गाजलेली गाणी पाहायला मिळाली. तर पाहूया २०२५ मधील सुपरहिट गाणी कोणती आहेत.
धुरंदर हा चित्रपट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झाला असून धुरंदर चित्रपटातील सर्वच गाणी फेमस झाली आहेत. पण फस्ला या गाण्याची गोष्ट काही वेगळीच झाली आहे. या गाण्याने प्रत्येकाला वेड लावले आहे.
सैयारा चित्रपट यावर्षी प्रचंड चर्चेत राहिला. अहान पांडे आणि अनित पड्डा या दोघांचे 'सैयारा तू तो बदला नहीं हैं' शीर्षक गाणं सगळ्यांच्या ओठांवर बसले आहे. तरुण वर्ग या गाण्याचा मोठा फॅन झाला आहे.
राधा थडानी हिचा पहिला चित्रपट आजाद गहा मोठ्या प्रमाणात फ्लॉप ठरला. पण या चित्रपटातील 'उई अम्मा' हे गाण सुपरहिट ठरुन एक पार्टी अॅंथम बनले आहे.
अक्षय कुमारचा हाउसफुल ५ हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही, पण या चित्रपटातील 'लाल परी' हे गाण सुपरहिट ठरले आहे.
वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटातील 'बिजुरिया' या गाण्यावर प्रेक्षक चांगलेच थिरकले आहेत. हे गाणं क्लब आणि लग्नात प्रचंड लोकप्रिय ठरले आहे.
आर्यन खानची डेब्यू वेब सिरीज 'द बॅड्स ऑफ बॉलिवुड' मधील 'गफूर' या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा एक 'दिवाने की दिवानीयत' हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरला. चित्रपटातील सगळीच गाणी सर्वांना आवडली पण त्यातील दिवानीयत या गाण्याने विक्रमी व्हूज मिळवले आहेत.