Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: आगामी निवडणुकीसाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकलं; कार्यकर्त्यांनाही दिला कानमंत्र, म्हणााले...

Municipal Elections: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने कंबर कसलीय. अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग फुंकलेत.

Bhagyashree Kamble

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं. राष्ट्रवादीचे एकूण ४१ आमदार निवडून आले होते. विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं कंबर कसलीय. पक्षाच्या समारोप शिबिरात अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय.

एका कार्यकर्त्यावर २५ घरांची जबाबदारी

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीबाबत अजित पवार म्हणाले, कुणीही पदासाठी इच्छुक असेल त्यांनी जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे. त्या कार्यकर्त्यावर २५ घरांची जबाबदारी दिली पाहिजे. प्रत्येक घराची सरासरी ४ मते लक्षात घेता, १०० मतदार मिळतील. यंदा महापालिका चारचा प्रभाग राहणार आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका वॉर्ड वाईज होतील, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी मनपा निवडणुकीतील प्रभाग रचनेत कसे बदल होत गेले याबाबात सांगितले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे म्हणाले होते, ४ प्रभाग असावे. त्यावेळी काहींनी २चा मुद्दा मांडला. तर उद्धव ठाकरे म्हणाले, २ राहू, ४ राहू द्या, तीनच करा. मग तीनच प्रभाग केले. त्यानंतर समीकरणे बदलली. एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार आले. त्यांनी ४च प्रभाग केले. त्यामुळे आता तेच राहणार आहे.

आता प्रभागात प्रत्येक उमेदवाराने ५०-५० कार्यकर्ते तयार केले तर २०० लोक होतील. असे प्रत्येक प्रभागात २०० लोक होतील. असे मिळून आपले २० हजार मते होतील, असे सूत्र अजित पवार यांनी सांगितले. शिर्डीत राष्ट्रवादी पक्षाचे २ दिवसीय अधिवेशन होते. त्या अधिवेशनात समारोप प्रसंगी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग फुंकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT