तोलून मापून बोलण्याचा अजित पवारांचा सल्ला
लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत
अजित पवारांनी कुणाला दिला संदेश
सचिन बनसोडे, अहिल्यानगर | साम टीव्ही
परखडपणा, बेधडक, स्पष्ट वक्ते असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी राजकारणात येणाऱ्या नवतरुणांना अत्यंत महत्वाचा सल्ला दिला आहे. आताच्या युगात तोलून मापून आणि विचारपूर्वक बोलावं लागतं. सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं, असं पवार म्हणाले.
अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. बेधडक स्वभाव असलेल्या पवार यांनी राजकारणात येणाऱ्या युवा पिढीला मोलाचा सल्ला दिला. तोलून मापून आणि कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. पुढच्या काळात काम करायचं असेल तर पारदर्शकता ठेवणं, लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर देणे आणि क्वालिटीचं काम करून दाखवणं या गोष्टी महत्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.
राजकारणात येणाऱ्या तरुणांना सल्ला देतानाच जनसंपर्काचं महत्वही अजित पवार यांनी समजावून सांगितलं. जनसंपर्क ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण निवडून आला आणि दुर्लक्ष केलं असं चालत नाही. कारण आमच्या काळात कामकाजाची पद्धत वेगळी होती. आता वेगळी आहे. काळानुरुप मतदारांचे मत देखील बदलत असते, असंही ते म्हणाले.
तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आता सोशल मीडियाने तर संपूर्ण जग व्यापलं आहे हे नाकारता येत नाही. कुठे काय गेलं, कोण गेले, कोण काय बोललं हे सगळ्या गोष्टी तत्परतेने समजतात. त्यामुळे तोलून मापून विचारपूर्वक बोलावं लागतं. कुठल्याही घटकांना नाराज न करता शेवटी सगळ्यांना सोबत घेऊन चालवं लागतं. त्या पद्धतीने काम करावं लागतं, असंही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.