Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

Raj Thackeray-Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी त्यांचा पराभव अटळ आहे, अशी भविष्यवाणी भाजपच्या नेत्यानं केली आहे.
uddhav Thackeray And Raj Thackeray
uddhav Thackeray And Raj Thackeraysaam tv
Published On
Summary
  • मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा विरोधकांचा आरोप

  • भाजप नेत्याची राज-उद्धव ठाकरेंवर टीका

  • महापालिका निवडणुकीत ठाकरेंचा पराभव निश्चित

भारत नागणे, पंढरपूर | साम टीव्ही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच विरोधकांनी आरोपांची राळ उडवून दिली आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ, बोगस मतदार असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. निवडणूक आयोगावर आरोप होत असताना भाजपच्या नेत्यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. ठाकरे बंधू एकत्र आले तरी, महापालिकेत त्यांचा पराभव निश्चित आहे, अशी भविष्यवाणी भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.

राज्यात जवळपास ९६ लाख बोगस मतदार आणल्याचा आरोप राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला. मतदार यादीतील घोळ मिटवा आणि नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असेही ते म्हणाले. याशिवाय आम्ही निवडणूक आयोगावर आरोप केले तर, भाजपचे नेते त्याला उत्तर का देतात, असा सवालही राज यांनी उपस्थित केला असतानाच, भाजप नेते गोरे यांनी राज यांच्यासह उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्रित आले तरी विशेषतः मुंबई महापालिकेत त्यांचा पराभव निश्चित आहे, असे जयकुमार गोरे म्हणाले. ज्यांनी मतदारयाद्याच पहिल्यांदा बघितल्या, त्यांना कसं कळालं हेच मला समजत नाही. मुळात याद्या वाचल्या पाहिजेत. त्यातील तपशील तपासले पाहिजेत, असा टोलाही गोरेंनी लगावला.

आता त्यांच्या हातात काहीच राहिले नाही. निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे हे निश्चित आहे. याची खात्री पटल्यानेच आता निवडणुकीपासून पळायचं आणि आतापर्यंत ईव्हीएमवर खापर फोडलं जात होतं. आता मतदार यादीवर खापर फोडायचा आहे. हे अस्वस्थ झालेले आणि जनाधार गमावलेले लोक आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी काही उपयोग होणार नाही. एकत्र येऊन ठाकरे बंधू लढाई जिंकू शकत असते तर, अशा गोष्टी करण्याची गरजच नव्हती, अशी टीकाही त्यांनी केली.

हे अस्वस्थ झालेले, जनाधार गमावलेले नेते आहेत. ठाकरे एकत्र आले तरी काही उपयोग नाही.
जयकुमार गोरे

गोरेंचं स्पष्टीकरण

मागील निवडणुकीत मतदार बाहेरून आणल्याची वक्तव्ये काही नेत्यांनी केली होती. त्यावरून सत्ताधारी पक्षांवर टीका होत असताना जयकुमार गोरेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. बोगस मते आणली असे म्हणाले नाहीत. माझ्या मतदारसंघात मुंबईत राहणारे २०-२५ हजार मतदार आहेत. प्रत्येकाच्या मतदारसंघात कोकणातल्या लोकांचे मतदान पुणे-मुंबईत आहे. या सुद्धा मतदारसंघातील काही लोक पुण्यात राहतात, त्यांना मतदानाला आणले तर त्यात काय गैर आहे. हे काय माहीत नाही का? जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढला आहे, असे गोरे म्हणाले.

uddhav Thackeray And Raj Thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडओ'; म्हणत दाखवला नरेंद्र मोदींचे ते भाषण|VIDEO

युती होणार नाही, तिथं वेगळे लढू

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यादृष्टीनं राजकीय पक्षांनी समीकरणं जुळवायला सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवर युती, आघाडी करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर विचारमंथन सुरू आहे. महायुतीमध्ये अनेक ठिकाणी अजूनही पेच आहे. त्याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. ज्या ठिकाणी युती होणार नाही, तिथे वेगळे किंवा मैत्रीपूर्ण निवडणूक लढू असे ते म्हणाले होते. त्याचीच री भाजप नेते गोरे यांनी ओढली आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा आमचा सगळ्यांचाच संकल्प आहे. ज्या ठिकाणी महायुती होणार नाही, तिथे वेगळे लढू. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊन काम करू, असे गोरे म्हणाले.

uddhav Thackeray And Raj Thackeray
Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com