भाजप आमदारांनी केलेल्या गदारोळावर अजित पवार म्हणाले... सुमित सावंत
महाराष्ट्र

भाजप आमदारांनी केलेल्या गदारोळावर अजित पवार म्हणाले...

विधानपरिषदेच्या १२ प्रलंबित आणि भाजपच्या १२ निलंबित आमदारांचा काहीही संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत

मुंबई : विधानसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी व अध्यक्षांचा अपमान केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १२ निलंबित आमदारांबद्दल प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, विरोधकांनी लोकशाहीच्या मंदिराचा अपमान केला असून विरोधकांची कालची कृती अशोभनीय व निंदनीय बाब होती. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला ठेच पोहचवणारा प्रकार विरोधकांनी केला आहे. Ajit Pawar said on the Disturbance of BJP MLA

हे देखील पहा -

विधानपरिषदेच्या रिक्त १२ जागांमुळेच भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे असा आरोप विरोधक करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले कि, ज्यांनी सभागृहात गोंधळ घातला ते 12 आमदार निलंबित झाले असून कावळा बसायला फांदी तुटायला गाठ पडली आहे.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ प्रलंबित जागांशी या निलंबित १२ आमदारांचा संबंध नाही. तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव हे एक शिवसैनिक आहेत. माझ्यासारखे तापट असून देखील ते काल शांत बसले व संयमाने वागत होते, मात्र या गोंधळ घालणाऱ्या सदस्यांनी अध्यक्षांचा देखील अपमान केला.

आम्ही याच्या आधीही सत्तेमध्ये होतो, अनेक मुख्यमंत्र्यांना या सभागृहात पाहिले आहे आणि विरोधकांनाही आम्ही पाहिलं आहे. मात्र, आजपर्यंत असा प्रकार विधानभवनात या आधी कधीच झाला नव्हता. लोकशाहीत विरोध असावा मात्र विरोध करण्याची परंपराच विरोधकांनी पायदळी तुडवली आहे. सभागृहाचे पावित्र्य आजपर्यंतच्या विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी राखलं आहे. काल मात्र विरोधकांचा इतका का तोल गेला हे समजत नसल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली ती योग्यच असून संसद आणि विधानसभेत बेलगाम असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी असे सुप्रीम कोर्टाने सांगितले असल्याचे अजित पवार म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT