ajit pawar news saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवर अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असं वक्तव्य केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशिल थोरात

Ahmednagar News : कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांतील आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील बिनविरोध होणार नाहीत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी मुंबई वगळता कुठलीही निवडणूक बिनविरोध झालेली नाही त्यामुळे या दोन्ही जागेवर निवडणूक होणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं. 'राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबच चालल्या आहेत. निवडणुका आणखी लांबू शकतात. मात्र निवडणुका कधी घ्यायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यांवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. आव्हाड यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, 'जितेंद्र आव्हाड यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक विधान आहे. पक्षातील नेत्यांचे वैयक्तिक मत असू शकतात. पक्षाच्या प्रवक्त्याने एखादं मत व्यक्त केलं तर ते पक्षाचे मत असू शकतं. मात्र आव्हाड पक्षाचे प्रवक्ते नाहीत ते नेमकं काय बोलले हे देखील मला माहित नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गृहराज्यमंत्री यांच्या आदेशानंतर सुद्धा पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारला

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

Shweta Tiwari: वयाची चाळीशी ओलांडली तरी दिसतेय चिरतरुण; श्वेता तिवारीचं फिटनेस रुटीन काय?

शरीरात 'हे' बदल दिसले तर दुर्लक्ष करू नका; असू शकतात गंभीर आजार

'याच्यामुळे माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला', शिंदेसेनेच्या नेत्याचा बॅनर फाडत मुलीचा गंभीर आरोप; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT