अजित पवार विमान अपघातावर घातपाताची शक्यता व्यक्त
रोहित पवारांकडून विमान कंपनीच्या निष्काळजीपणावर शंका
डीजीसीएच्या माजी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांचा अपघात झाला नाही तर घात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पवार कुटुंबियांनाही घातपात असल्याची शंका आहे. त्याबाबत रोहित पवार यांनी आज विमान दुर्घटनेसंदर्भात पत्रकार परिषद घेत शंका आणि अनेकांना पडलेले प्रश्न उपस्थित केले.
विमान अपघाताचा तपास केवळ 'अपघात' म्हणून न करता यातील तांत्रिक त्रुटी आणि कंपनीच्या निष्काळजीपणाची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. "या विमान कंपनीत डीजीसीएचे माजी अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांचे तपास अहवाल खोटे असू शकतात," असा आरोप संशय रोहित पवारांनी व्यक्त केला.
रोहित पवारांनी 'व्हीएसआर व्हेंचर्स' या कंपनीच्या जागतिक रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. परदेशातही या कंपनीने एका घटनेचा अहवाल दिलेला नव्हता. यामुळे युरोपियन एजन्सींनी या कंपनीचे परवाने रद्द केले होते. मात्र तरीही या कंपनीची विमाने भारतात उडविली जात आहेत. अजितदादांचा मृत्यू होऊनही या कंपनीवर अद्याप बंदी का घातली जात नाही?" असाही सवाल रोहित पवार यांनी केला.
बारामती विमानतळावर अद्ययावत आयएलएस सिस्टीम नसल्याची चर्चा होतेय. त्यावरून बोलताना रोहित पवार म्हणाले, २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. "मुंबईत अद्ययावत यंत्रणा असतानाही या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला, त्याचा रिपोर्ट अद्याप का आला नाही? तो रिपोर्ट दाबला गेला नसता, तर कदाचित अजितदादांचा अपघात झाला नसता, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.