Ajit Pawar Plane Crash In Baramati  
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: पायलटकडून MAYDAY कॉल गेलाच नाही? अपघातावेळी पायलट अन् ATC चं काय झालं बोलणं?

Ajit Pawar Plane Crash In Baramati : बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातापूर्वी पायलटनं मेडे कॉल केला नसल्याचं सरकारने दिलेल्या निवदेनात म्हटलंय.

Bharat Jadhav

  • अपघातग्रस्त विमान हे खासगी लिअरजेट ४५ विमान होते.

  • फॉरेन्सिक टीमला ब्लॅक बॉक्स सापडला आहे.

  • पायलटला दृश्यमानता पाहून लँडिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे बारामती विमान अपघातात निधन झाले आहे. AAIB ने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. फॉरेन्सिक टीमला ब्लॅक बॉक्स सापडला असून त्या अपघातस्थळाची पाहणी सुरू. दरम्यान या अपघाताबाबत सरकारने आता एक निवेदन जारी केले आहे. बुधवारी अजित पवार यांना बारामतीला घेऊन जाणारे विमान रनवे ११ वर उतरण्यास परवानगी देण्यात आली होती, असं या निवेदनात म्हटलंय.

अजित पवार यांना मुंबईहून बारामतीला घेऊन जाणारे विमान हे खासगी लिअरजेट ४५ विमान होते. व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या या चार्टर्ड विमानात दोन पायलट होते. अपघातावेळी पायलटनं MAYDAY कॉल दिला नव्हता, असं सरकारने दिलेल्या एका निवदेनात म्हटलंय. याबाबतचे वृत्त आज तक वृत्तवाहिनी दिलंय. सरकारने म्हटले आहे की, एअर कंट्रोलला कोणताही अहवाल मिळाला नाही. सुरुवातीला क्लिअरन्स मागणीच्या कॉलनंतर एटीसीला आगीच्या ज्वाळा दिसल्या.

सरकारने अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सुरू केला आहे. यानुसार विमान अपघातापूर्वी एटीसीला कोणताही MAYDAY कॉल आला नाही. तसेच पायलटने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची तक्रार केली नव्हती. VI-SSK या विमानाने सकाळी ०८:१८ वाजता बारामती एटीसीशी संपर्क साधला. विमान बारामतीपासून ३० नॉटिकल मैल (NM) अंतरावर होते त्यावेळी एअर कंट्रोललाल कॉल केला होता.

त्याला पुणे अ‍ॅप्रोचमधून सोडण्यात आले. त्यानंतर पायलटला त्याच्या विवेकबुद्धीनुसार दृश्यमानता हवामान परिस्थिती पाहून लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान अपघातग्रस्त विमानाच्या कर्मचाऱ्यांनी हवा आणि दृश्यमानतेबद्दल चौकशी केली. त्यावेळी एटीसीने हवा शांत आहे आणि दृश्यमानता सुमारे ३००० मीटर असल्याचं सांगितलं होतं.

त्यानंतर विमानाने धावपट्टी ११ वर जाण्यासाठी अंतिम मार्गाचा अहवाल दिला, परंतु धावपट्टी दिसत नव्हती. म्हणून, त्यांनी गो-अराउंड केलं. गो-अराउंडनंतर विमानाला त्याच्या स्थानाबद्दल विचारण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते धावपट्टी ११ वर पोहोचण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं. धावपट्टी दिसल्यावर त्यांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले. त्यावेळी विमानाच्या वैमानिकांनी एटीसीला सांगितले की धावपट्टी दिसत नाहीये. पण दिसू लागताच ते त्यांना कळवतील.

काही सेकंदांनंतर, त्यांनी धावपट्टी दिसत असल्याचे कळवले. सकाळी ८:४३ वाजता विमानाला धावपट्टी ११ वर उतरण्याची परवानगी देण्यात आली, परंतु क्रूने ही लँडिंग क्लिअरन्सचा रिडबॅक केला नाही. त्यानंतर एटीसीला आगीच्या ज्वाळा दिसून लागल्या होत्या. पायलट नेहमीच एटीसीला त्याचे विमान अपघातग्रस्त होणार आहे याची माहिती देण्यासाठी मेडे कॉल करतो. पण अजित पवारांच्या विमानाचा पायलट सुमित कपूरने मेडे कॉल केला नाही. तसेच सह-पायलट कॅप्टन संभावी पाठकनेही मेडे कॉल केला नाही. त्यांचे शेवटचे शब्द होते "ओह शिट...ओह शिट." कॉल रेकॉर्डमध्ये ऐकू आले. यानंतर कोणाचाही आवाज रेकॉर्ड झाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आर्थिक स्थिती उत्तम असेल, ५ राशींसाठी दिवस खडतर; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ajit Pawar Death News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

कंठ दाटला, शब्दही फुटत नव्हते....अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार भावुक|VIDEO

Ajit Pawar Death: राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

SCROLL FOR NEXT