ajit Pawar plane accident video Saam tv
महाराष्ट्र

अजितदादांच्या विमानात स्फोटके? खासदाराच्या वक्तव्याला अमोल मिटकरींचा दुजोरा, राजकीय वर्तुळात खळबळ

ajit pawar plane crash : विमान कोसळण्या आधीच स्फोट झाल्याचा गोजुबावीच्या नागरिकांनी दावा केला आहे. या विमानात स्फोटके होती का? या खासदार बजरंग सोनवणे यांच्या शंकेला वाव देणारा दावा आहे, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

Vishal Gangurde

अजित पवारांच्या विमान अपघातावर स्फोटाचा संशय व्यक्त केलाय

खासदार बजरंग सोनवणे यांच्या दाव्याला अमोल मिटकरींचा दुजोरा

उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशीची मागणी मिटकरींनी केली

अक्षय गवळी, साम टीव्ही

अजित पवारांचा अपघाती मृत्यू होऊन १५ दिवस झाले आहेत. अजितदादांच्या मृत्यूनंतर आता अपघातावरून शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यांच्या विमान अपघातावरून नेत्यांकडून नवनवीन दावे केले जात आहेत. रोहित पवार यांनीही अपघातावरून शंका उपस्थित केली आहे. तर अजित पवारांच्या विमानात स्फोटके असल्याचा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता. खासदार बजरंग सोनवणे यांच्या दाव्याला आमदार अमोल मिटकरी यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात झालेल्या विमानाचा कोसळण्याआधीच स्फोट झाल्याचा दावा आज विमानतळा नजीकच्या गोजुबावीच्या काही नागरिकांनी केला होता. या नागरिकांचा हा दावा खासदार बजरंग सोनवणे यांच्या आरोपाला दुजोरा देणारा असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हटलं आहे. खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांच्या विमानात स्फोटक होती का? अशी शंका उपस्थित केली होतीय.

या संपूर्ण विमान अपघाताची चौकशी उच्चस्तरीय बाह्य यंत्रणांकडून करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सीआयडी चौकशीला काही मर्यादा येत असल्याच ते म्हणालेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. यावर बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी सुनेत्रावहिनी या आईच्या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलत असल्याचे ते म्हणालेय. अजितदादांच्या जाण्याने पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी, आमदार, खासदार सैरभैर झाल्याचे ते म्हणालेय. अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुख म्हणून सुनेत्रा वहिनींचा संवाद हा प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणार असल्याचच ते म्हणालेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Men's Skin Care : पुरुषांनी उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या स्टेप्स

Youtuber anurag Dobhal: बिगबॉस फेम यूट्युबरने सोशल मीडियावर केली शेवटची पोस्ट; मनोरंजन सृष्टीत खळबळ

मुख्यमंत्री राज्यसभेवर जाणार; भाजपकडून रिक्त खुर्चीवर कोणाला संधी मिळणार? ४ जणांची नावे चर्चेत

Maharashtra Live News Update: बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचं जळगाव कनेक्शन

Shivani Rangole: हिरवी चोळी, हिरवी साडी, टीव्हीवरच्या मास्तरीणबाईंचं खुललं सौंदर्य

SCROLL FOR NEXT