Rohit Pawar PC on Ajit Pawar Plane Crash Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा अपघात झाला की घात?अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं? रोहित पवारांचा विमान कंपनीवर गंभीर आरोप

Rohit Pawar PC on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत पवार कुटुंबाच्या शंका व्यक्त केल्या.

Bharat Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामतीत दुर्दैवी विमान अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले. या अपघाताबाबत सर्वसामान्यांसह पवार कुटुंबाच्या मनातही अनेक शंका आल्या. आज आमदार रोहित पवार हे आज पत्रकार परिषद घेत पवार कुटुंबियांना असलेल्या शंका सर्वांसमोर मांडल्या. रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली.

अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. दादांचा अपघात झाला की घात असा प्रश्न सर्व नागरिकांच्या मनात आहे. यामुळे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत दादांसोबत नेमकं काय घडलं याची दिली. अजित दादांचे विमान कसं पडलं? अपघात झाला कसा प्रश्न रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केली.

अजित पवार यांचे ज्या कंपनीचे व्हीएसआर विमान होते, त्या कंपनीच्या एका विमानाचा दोन वर्षापूर्वी अपघात झाला होता. २०२३ मध्ये या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता. मात्र त्याचा कोणताच अहवाल आलेला नाहीये.मात्र जेव्हा अजितदादांचा अपघात झाला त्यानंतर विमानन विभागाने अहवाल जाहीर केला. यावरून डीजीसीएवर व्हीएसआरचा दबाव असल्याचं दिसून येतं. २०२३ मध्ये झालेल्या अपघाताचा रिपोर्ट दाबण्यात आला होता.

युरोपियन एजन्सींनी या कंपनीचे परवाने रद्द केले होते. तरीही या कंपनीची विमाने भारतात उडविली जात आहेत. अजित दादांचा मृत्यू होऊनही या कंपनीवर अद्याप बंदी का घातली जात नाही?" असा सवालही रोहित पवार यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT