NCP leaders raise serious questions seeking clarity after former Deputy CM Ajit Pawar’s tragic aircraft crash. Saam Tv
महाराष्ट्र

अजित पवारांचा अपघात की घातपात? राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केला संशय, राजकीय वर्तुळात खळबळ

Ajit Pawar Plane Crash An Accident Or Sabotage: अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करत आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशयाची छाया

आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केले

मृतांची संख्या आणि पायलट बदलावरून गोंधळ

राष्ट्रवादी नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांची पारदर्शक चौकशीची मागणी

प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'साम'शी बोलतांना आमदार अमोल मिटकरी यांनी या गंभीर प्रश्नावर उत्तर देण्याची विनंती सरकार आणि यंत्रणांना केली आहे. अपघातानंतर डीजीसीएने सहा लोकांचा मृत्यू झाल्याचा म्हटलं होतं. मग पाच मृतदेह कसे समोर आलेत? विमान आणि विमान चालक यांचा इतिहास समोर असतानाही तेच विमान आणि तोच विमान चालक कसा देण्यात आला.

आदल्या रात्री अजितदादांचा दौरा वेगळा असताना ऐनवेळी विमानाने जाण्याचा निर्णय कसा झाला. यासंदर्भात लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत असे अमोल मिटकरी म्हणाले. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी देखील मोठा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय?

मा.अजित दादांच्या अचानक जाण्याने बधिर झालो कसे झाले का झाले काहीच कळत नाही.देवाने लाखोच्या पोशिंदा नव्हता न्यायचा आमच्या सारखे नेहयचे होते अत्यंत अघटीत घडले.आता जे घडले त्याचे सत्य संपूर्ण तपशील,पारदर्शक चौकशी जगासमोर येणे तितकेच महत्वपूर्ण आहे. राहून राहून मनात हे प्रश्न येतात त्याची उतरे मिळाली पाहिजेत.

फ्लाइट 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्राफिकमध्ये अडकल्याचा दावा, दोघांचा एकाच वेळी उशीर, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरची सेफ्टी प्रक्रिया—या सर्व बाबींची सविस्तर व पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही? याची चौकशी होणे गरजेचे कारण घात की अपघात?असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT