NCP leaders conflict updates Saam TV Marathi
महाराष्ट्र

प्रफुल्ल पटेलांच्या बॅनरवरुन अजितदादांचा फोटो गायब, राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? पाहा व्हिडिओ

NCP leaders conflict updates : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा बॅनर वाद पेटला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो गायब असल्याने अंतर्गत राजकारण तापलं असून विविध नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Bharat Mohalkar

राष्ट्रवादीच्या बॅनरवरुन अजितदादांचा फोटो गायब असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय... याच मुद्द्यावरुन पवारांच्या राष्ट्रवादीनं पटेल आणि तटकरेंना घेरलंय... मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना दादांचा कसा विसर पडत चाललाय ? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

हा बॅनरचा फोटो नीट पाहा... अजित पवारांच्या मृत्यूला अवघे दोन महिनेच झालेत... मात्र या दोन महिन्यातच राष्ट्रवादीच्याच पटेल आणि तटकरेंना दादांचा विसर पडायला लागल्याचा आरोप करण्यात येतोय...

हा बॅनर आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडामधील...या बॅनरवर प्रफुल्ल पटेलांचा भलामोठा फोटो दिसतोय.. बॅनरवर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांचाही फोटो आहे... मात्र या बॅनरवर पटेलांना विसर पडलाय तो राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा.... असा आरोपच पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय...

तटकरेंनंतर पटेलांनाही अजित दादांच्या फोटोची अडचण

विदर्भातील तिरोडामधील बैठकीत बॅनरवर दादांचा फोटोच नाही

स्वतःचे फोटो लावून पटेल-तटकरेंनी आम्ही तुमचे नसून स्वतंत्र असल्याचं दाखवून दिलं

पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे दिसत आहेत

प्रफुल्ल पटेल तुमच्या कृतघ्नपणाचा निषेध

स्वतःला दादाप्रेमी म्हणवणारे त्यांच्या पक्षातील आमदार गुलाम असावेत नाहीतर ढोंगी

विकास लवांडेंनंतर दादांच्याच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनीही पटेलांना घरचा आहेर दिलाय...दादा जनतेच्या मनात आहेत... बॅनरवर फोटो टाकला नाही म्हणून दादा लोकांच्या मनातून जाणार नाहीत, असा टोला मिटकरींनी लगावलाय...

खरंतर बॅनरवरुन अजित पवारांचा फोटो वगळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही... तर याआधीही रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सत्कार सोहळ्यात बॅनरवर तटकरे कुटुंबियांचे फोटो होते.. मात्र बॅनरवरुन अजित पवारांचा फोटो वगळला होता.. त्या प्रकरणी आदिती तटकरेंनी माफीही मागितली होती.. त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या वेळी प्रफुल्ल पटेल सभास्थळी जात होते.. मात्र त्यावेळीही त्यांनी अजित पवारांना अभिवादन न करताच गाडीतून थेट स्टेजकडे गेल्याचं समोर आलंय.. त्यामुळेच पटेल आणि तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप रोहित पवारांनी केला होता... आता बॅनरवर फोटो न लावणं, दादांना अभिवादन न करणं....हे नजरचुकीनं झालं की यामागे पक्षावर आपलंच वर्चस्व असल्याचा संदेश कार्यकर्त्यांना देण्याचा हेतू तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT