मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांनी 'चलो मुंबई'ची हाक दिल्यानंतर ओबीसी नेतेही आक्रमक झालेत. आझाद मैदानातल्या आंदोलनावरुन लक्ष्मण हाकेंनी सत्ताधारी पक्षांवरही गंभीर आरोप केलेत. सरकार उलथवून टाकण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही सामील असल्याचा दावा हाकेंनी केलाय.
मनोज जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार, खासदारांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजुंच्या नेत्यांचा समावेश आहे. यातील काही जण थेट आंदोलनात सहभागी झाले आहेत, तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. कोणी पाठींबा दिलाय
जरांगेंना कुणाकुणाचा पाठिंबा?
आ. उत्तम जानकर
माळशिरस, राष्ट्रवादी (SP)
आ. नारायणआबा पाटील
करमाळा, राष्ट्रवादी (SP)
आ. अभिजीत पाटील
माढा, राष्ट्रवादी (SP)
आ. रोहित पवार
कर्जत-जामखेड, राष्ट्रवादी (SP)
आ. बाबासाहेब देशमुख
सांगोला, शेकाप
आ. सरोज अहिरे
देवळाली, राष्ट्रवादी (AP)
आ. विजयसिंह पंडित
गेवराई, राष्ट्रवादी (AP)
आ. प्रकाश सोळंके
माजलगाव, राष्ट्रवादी (AP)
आ. राजेश विटेकर
पाथरी, राष्ट्रवादी (AP)
आ. राजू नवघरे
वसमत, राष्ट्रवादी (AP)
सना मलिक
अणुशक्तीनगर, राष्ट्रवादी (AP)
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला ओबीसी नेत्यांचा तीव्र विरोध आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही गरज पडल्यास मुंबईकडे जाण्याचा इशारा दिलाय. आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना खरच सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत का? याची चर्चा सुरु झाली आहे. कारण महायुतीतली धुसफुस लपून राहिली नाही. फडणवीस-शिंदेंमधील मतभेद समोर येतायेत. अशातच फडणवीस हे शिंदेंना आरक्षणाचं काम करु देत नाहीत, असा आरोप जरांगेंनी केलाय. दुसरीकडे अजित पवारही आरक्षणाच्या मुद्यापासून चार हात लांब असल्याचं चित्र आहे. जरांगेंचा टीकेचा सगळा फोकस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं चक्रव्यूह मुख्यमंत्री फडणवीस कसे भेदतात ?हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.